एकरकमी एफआरपीची स्वाभिमानीची मागणी

एकरकमी एफआरपीची स्वाभिमानीची मागणी

निफाड । प्रतिनिधी | Niphad

उसाला एकरकमी एफआरपी (FRP) द्यावा, कांदा निर्यातीला (Onion export) चालना देण्यासाठी आखाती देशातील कांदा आयात धोरण (Onion Import Policy) रद्द करावे,

शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा (power supply) करावा आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (swabhinani shetkari sanghatna) वतीने प्रांत कार्यालयात निवेदन (memorandum) दिले असून मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलनाचा (agitation) इशारा दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने (state government) एफआरपीचे दोन तुकडे करण्यासाठी ऊसदर नियंत्रण अध्यादेशामध्ये केलेली दुरुस्ती त्वरित मागे घेऊन येणार्‍या हिवाळी अधिवेशनामध्ये (Winter session) पुन्हा दुरुस्ती करून एकरकमी एफआरपी देण्याचा कायदा करावा. केंद्र सरकारने 60 लाख टन साखरेच्या निर्यातीस परवानगी दिली असून आणखी 30 लाख मे.टन साखर निर्यातीस परवानगी द्यावी.

केंद्र सरकारने साखरेची किंमत 3500 रु. प्रतिक्विंटल निश्चित करून इथेनॉलच्या (Ethanol) किमतीमध्ये प्रतिलिटर पाच रुपयांची वाढ करावी. कांंदा निर्यातीस चालना देऊन आखाती देशातील कांदा आयात धोरण (Onion Import Policy) रद्द करावे. कांद्याला चांगला दर मिळावा यासाठी केंद्र व राज्य सरकारने त्वरित प्रयत्न करावे. वाढते भारनियमन रद्द करून शेतीसाठी दिवसा सुरळीत वीजपुरवठा (power supply) करावा.

वरील मागण्यांच्या अनुषंगाने माजी खासदार राजू शेट्टी (Former MP Raju Shetty) यांनी 25 नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली असून निफाड येथेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने याबाबत आंदोलन करण्यात येणार असून त्यापूर्वीच शेतकर्‍यांच्या भावना विचारात घेऊन शासनाने वरील मागण्यांची सोडवणूक करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे, तालुकाध्यक्ष गजानन घोटेकर, शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, संजय पाटोळे, पुंजाराम कडलग यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा पदाधिकार्‍यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com