टपाल विभागाच्या पाकिटावर प्रसिद्ध पैठणी

टपाल विभागाच्या पाकिटावर प्रसिद्ध पैठणी

येवला । प्रतिनिधी Yevla

येवल्याची जगप्रसिद्ध पैठणी The world famous Paithani of Yeola दिसणारा आता डाक विभागाच्या पाकिटावर envelope of the postal department दिसणार आहे. येवल्यातील जगप्रसिद्ध पैठणी आता भारतीय डाक विभागाच्या पाकिटावर देखील दिसणार आजे.

येवला पैठणी नगरीतच या पैठणी पदर असलेल्या डाक पाकिटाचे अनावरण डाक अधीक्षक नितिन येवला, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर तसेच पैठणी विणकर यांच्या हस्ते करण्यात आले.

पैठणी साडीला देखील जी आय मानांकन प्राप्त झाल्यामुळे या पैठणी साडीचा पदर डाक विभागाच्या स्पेशल कव्हरवर येणार आहे. महाराष्ट्र सर्कलमध्ये ज्या ज्या गोष्टींना जी आय मानांकन प्राप्त होते अशा सर्व गोष्टी डाक पाकिटावर छपाई केली जात असते. त्यामुळे आता संपूर्ण भारत भर आता जी आय मानांकन असलेली पैठणी डाक विभागाच्या स्पेशल कव्हरवर दिसणार आहे.

यावेळी डाक विभागाचे अधीक्षक नितीन येवला, डाक निरीक्षक चांदवड राजेंद्र वानखेडे, डाक निरीक्षक मनमाड पंकज दुसाने, येवला पोस्ट मास्टर बी.आर. जाधव, पैठणी उत्पादक कृष्णा वडे, बाळासाहेब कापसे, श्रीनिवास सोनी,राजेश भांडगे आदी सह पैठणी विणकर व डाक कर्मचारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com