'चुलीवरच्या मिसळ'ला ओळख देणाऱ्या सिताबाईंचे निधन

'चुलीवरच्या मिसळ'ला  ओळख देणाऱ्या सिताबाईंचे निधन

जुने नाशिक | Nashik

एक प्रकारे जुन्या नाशकाची ओळख असलेल्या येथील प्रसिद्ध सीताबाई मिसळच्या (Sitabai Misal) संचालिका सीताबाई मोरे यांचे निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षांपर्यंत शेवटच्या श्वासपर्यंत बाईने तिच्या हातची टेस्टी मिसळ खायला दिली.

बाईच्या तापट स्वभावाचे नेहमी कौतुकच वाटायचे, कारण एकटी बाई स्वतः मिसळ बनवायची सर्वांना वाढायची पण तिनेच बश्या पण तिनेच धुवयाच्या पैसे पण तिनेच घेयाचे एक हॉटेल त्यांनी चालवली. त्यांच्याकडे ना कोणता स्टाफ ना कारागीर ना हेल्पर "सबकुछ बाई' असा प्रवास होता. जुने नाशिक परिसरातील (Old Nashik) बुधवार पेठ भागात त्यांचे हॉटेल ज्येष्ठांपासून पासून तरुणांपर्यंत आकर्षणाचे केंद्रबिंदू होते.

जुने नाशिकची एक प्रकारे सीताबाई ची मिसळ ओळख झाली होती. विशेष म्हणजे ज्या काळी मिसळला लोक एवढा महत्त्व देत नव्हते, त्या काळी त्यांनी चुलीवरची मिसळ (Chulivarchi Misal) सुरू केली होती. हळूहळू तिचे आकर्षण एवढे वाढले होते की लोक सकाळपासून या ठिकाणी मिसळ खायला यायचे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com