
देवळा | प्रतिनिधी Deola
लोहोणेर (Lohoner) येथे शुक्रवारी (दि ११) कथित प्रेयसी व तिच्या कुटुंबियांनी प्रियकराला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याप्रकरणी देवळा पोलिसांनी (Deola Police) प्रेयसीसह तीचे आई, वडिल, व दोन भाऊ असे पाच जणांना ताब्यात घेतले आहे. आज शनिवारी (दि. १२) त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी (Four days police Custody) सुनावली आहे....
लोहोणेर (Lohoner) येथील युवक गोरख बच्छाव (वय ३१) हा काही वर्षापूर्वी रावळगाव ता.मालेगाव (Rawalgaon Tal Malegaon) येथील युवतीच्या संपर्कात आल्याने दोघांमध्ये प्रेम संबध निर्माण झाले होते.
मात्र, युवतीच्या घरच्यांनी तीचे दुसरीकडे लग्न निश्चित केले होते. हा विवाह मोडल्याने तो गोरख यानेच मोडल्याचा संशय मुलीच्या घरच्यांनी घेतला.
यानंतर संतप्त झालेले कुटुंबीय मुलीसह लोहोणेर (Lohoner) येथे आले. यावेळी गोरख याच्या डोक्यात लोखंडी सळईने वार करुन मुलीने त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले.
यात हा युवक गंभीर जखमी झाला आहे. घटना घडल्यानंतर संबंधित युवती व तिचे कुटुंबीय स्वतः पोलिसात हजर झाले होते. त्यानंतर देवळा पोलिसांनी विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पंधरा फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.