नांदगाव
नांदगाव
नाशिक

नांदगावमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची हत्या

तालुक्यातील वखारी येथील घटना

Gokul Pawar

Gokul Pawar

नांदगाव | नांदगाव

एकाच कुटुंबातील चार जणांचा गळा चिरून निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना तालुक्यातील वखारी येथे घडली आहे. या घटनेने तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मृतांमध्ये समाधान चव्हाण,भरताबाई चव्हाण या पती-पत्नीसह त्यांचा ६ वर्षाचा मुलगा गणेश चव्हाण आणि ४ वर्षाची आरोही चव्हाण यांचा समावेश आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास सुरू आहे.

दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com