येवला। प्रतिनिधी

सप्ताहात येथील मार्केट यार्डवर लाल कांदा आवक टिकून होती. परंतु देशात मागणी कमी झाल्याने बाजारभावात घसरण झाल्याचे दिसुन आले. कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश इत्यादी राज्यात व परदेशात मागणी सर्वसाधरण होती.

सप्ताहात एकुण कांदा आवक 43हजार 433 क्विटल झाली असुन, लाल कांद्याचे बाजारभाव किमान 500 रू. ते कमाल 3 हजार 481 रु. तर सरासरी 2 हजार 800 रु. प्रति क्विटल पर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसुल येथे कांद्याची एकुण आवक 26 हजार 500 क्विटल झाली असुन, लाल कांद्याचे बाजारभाव किमान 500 रु. ते कमाल 3 हजार 585 रु. तर सरासरी 2 हजार 800 रु. प्रति क्विटल पर्यंत होते.

गव्हाच्या आवकेत वाढ झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. गव्हास स्थानिक व्यापारी वर्गाची व देशांतर्गत मागणी सर्वसाधरण राहील्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात गव्हाची एकुण आवक 1 हजार 275 क्विटल झाली असुन, बाजारभाव किमान 1हजार 400 रु. ते कमाल 1803 रु. तर सरासरी 1650 रु. पर्यंत होते.मकाच्या आवकेत व बाजारभावात वाढ झाल्याचे दिसुन आले.

मकास व्यापारी वर्गाची मागणी चांगली राहिल्याने बाजारभावात वाढ झाली. सप्ताहात मक्याची एकुण आवक 24 हजार 495 क्विटल झाली असून, बाजारभाव किमान 1200 रु. ते कमाल 1521 रु. तर सरासरी 1460 रु. प्रति क्विटल पर्यंत होते अशी माहीती कृषी उत्पन्न बाजार समिती, येवला यांच्याकडुन देण्यात आली