वणी उपबाजारात कांदा दरात घसरण
नाशिक

वणी उपबाजारात कांदा दरात घसरण

कांदा खरेदी विक्रीची गती मंदावली

Abhay Puntambekar

दिंडोरी । प्रतिनिधी

करोनामुळे झालेल्या अस्थिर वातावरणामुळे कांदा दरात घसरण झाली आहे. सोमवारी उपबाजारात हजार क्विंटल कांदा आवक झाली. त्या तुलनेत मंगळवारी अवघा दोन हजार क्विंटल कांदा उत्पादकांनी विक्रीस आणल्याने आवकेवर परिणाम झाला आहे.

वणी उपबाजारात मंगळवारी १०८ वाहनामधुन दोन हजार क्विंटल कांदा उत्पादकांनी विक्रीस आणला होता. ९६१ कमाल ६०० किमान तर ८०० रुपये सरासरी प्रतिक्विंटलचा भाव उत्पादकांना मिळाला.

शुक्रवारी कांद्याला प्रतवारी व पाहुन ११६१ रुपये प्रतिक्विंटलचा दर उच्चतम मिळाला होता. त्यात घसरण होत ९६१ रुपयाचा दर मिळाला. सध्या अपेक्षित मागणी आणि भावही नाही. त्यामुळे शेतकर्‍यांपुढील अडचणी वाढल्या आहेत. पावसाची अपेक्षित हजेरी नाही.

तसेच भविष्यात कांद्याला मागणी राहील किंवा नाही याबाबतही अस्थिर चित्र असल्याने कांदा खरेदी विक्रीची गती मंदावली आहे. देशांतर्गत मागणीवर झाला आहे.

कांदा वाहतुक करणारे ट्रान्सपोर्टस व्यावसायिक यांच्यामध्ये करोनामुळे नैराश्याचे वातावरण आहे. त्यामुळे दुसर्‍या राज्यात तसेच महाराष्ट्रात विविध शहरात व कांदा खरेदी केंद्रात पाठविण्यात येणार्‍या अडचणीपुढे हात टेकण्याची वेळ आली आहे

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com