तोतया पोलिसांनी वृद्धास लुटले

तोतया पोलिसांनी वृद्धास लुटले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पोलीस असल्याची बतावणी करत भामट्यांनी वृद्धास २९ हजार रूपयांना लुटल्याचा प्रकार आडगाव नाका उड्डाणपुलाखाली घडला आहे...

याप्रकरणी धिरजभाई पोपटभाई गोहिल (६८, रा. सेवाकुंज, निमाणी, पंचवटी) यांनी तक्रार दाखल केली आहे.

गोहिल हे महामार्ग क्रॉस करत असताना दुचाकीवरून तेथे आलेल्या दोघांनी त्यांना पुढे पोलीस तपासणी सुरू असून तुमच्या पिशवीत गांजा असल्याची माहिती मिळाली आहे. असे सांगत पिशवीची तपासणी केली.

खिशातील पाकिट, सोन्याची अंगठी या वस्तू काढून घेत त्या पिशवीत ठेवल्याचे भासवून लंपास केल्या. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक वाय. एस. माळी करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com