Nashik News : बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त

Nashik News : बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त

दहिवड । वार्ताहर | Dahiwad

देवळा तालुक्यातील (Deola Taluka) डोंगरगाव परिसरात (Dongargaon Area) एका शेतातील शेडमध्ये बनावट देशी व विदेशी मद्य बनविण्याचा सुरू असलेला कारखाना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (Crime Branch Team) छापा (Raid) टाकत उध्दवस्त केला. या कारवाईत पोलिसांनी देशीविदेशी मद्याच्या साठ्यासह दारू निर्मितीसाठी लागणारे रसायन व साहित्य तसेच वाहन असा सुमारे दहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याविरूध्द देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

विशेष पोलीस पथकाने केलेल्या या कारवाईने अवैध विक्रीबरोबर बनावट मद्यनिर्मिती (Fake Liquor) देखील बिनदिक्कत केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. जिवासाठी धोकादायक अशा बनावट मद्याची निर्मिती करणार्‍यांविरूध्द पोलिसांनी (Police) कठोर कारवाई करावी तसेच अवैध दारू विक्रीचे तालुक्यातुन समुळ उच्चाटन करावे, अशी मागणी ग्रामस्थांतर्फे केली जात आहे.

देवळा तालुक्यातील डोंगरगाव परिसरात शेतात (Farm) शेडमध्ये देशीविदेशी बनावट मद्याची निर्मिती करणारा कारखाना चालविला जात असल्याची माहिती पो.नि. हेमंत पाटील यांना मिळताच उपनिरीक्षक दत्ता कांभीरे यांच्या पथकाने छापा टाकला असता शेडमध्ये कैलास मुुरलीधर अहिरे व प्रतिक कैलास अहिरे हे दोघे देशी व विदेशी बनावट मद्य तयार करत असल्याचे पोलिसांना आढळून आले.

दरम्यान, यावेळी देशीविदेशी दारू तयार करणारे रसायन, साहित्य, दारू विक्री व वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे वाहन, दारू भरण्यासाठी विविध कंपन्यांच्या रिकाम्या बाटल्या तसेच देशीविदेशी मद्य भरलेल्या २२३ बाटल्या असा सुमारे १० लाख ५ हजार ४४ रूपये किंमतीचा साठा पोलिसांना मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला. कैलास अहिरे, प्रतिक अहिरे या दोघांविरूध्द देवळा पोलीस ठाण्यात (Devla Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com