
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
महाराष्ट्रात (Maharashtra) गुटख्यावर (Gutkha) बंदी असताना सुद्धा शासनाचे आदेश डावलून बनावट गुटखा नाशिकरोड परिसरातील (Nashik Road Area) एकलहरे येथे बनविला जात होता. सदरचा बनावट कारखाना नाशिकरोड पोलिसांनी (Police) उद्ध्वस्त केला असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे...
नाशिकरोड पोलीस स्टेशनचे (Nashik Road Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके यांना गुप्त माहिती मिळाली की एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रालगतच्या रस्त्याने सामनगाव शहरातील मातृछाया फार्म हाऊसच्या समोर एका जुन्या घरात बनावट गुटखा (Fake Gutkha) बनविला जात आहे. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके, हवालदार पुंडलिक टेपने, संतोष पिंगळे, पोपट पवार, अविनाश हांडे, बाळकृष्ण सोनवणे, ताज कुमार लोणारी यांच्यासह आदींनी छापा टाकून लाखो रुपयाचा बनावट मुद्देमाल जप्त (Sezied) केला.
त्यामध्ये गुटखा बनविण्याचे मशीन तसेच केमिकल विविध कंपन्यांचे नाव असलेले लेबल आणि गुटखा बनविण्यासाठी लागणारा बनावट कच्चामाल जप्त करण्यात आला आहे. या कामगिरीबद्दल नाशिकरोड पोलिसांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी दिनेश बाबूलाल कुमार रा. कानपुर, निलेश दिनेश इंगळे रा.सिन्नर फाटा, नाशिकरोड आणि दीपक मधुकर चव्हाण रा. अंबड यांना अटक (Arrested) करण्यात आली आहे.