आमदारकीचे राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जा - आदित्य ठाकरे

येवल्यात आदित्य ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत
आमदारकीचे राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जा - आदित्य ठाकरे

येवला | प्रतिनिधी Yeola

येथील विंचूर चौफुली येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. आमदार नरेंद्र दराडे, माजी सभापती संभाजी पवार, जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. या निमित्ताने संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. ठाकरे यांच्या स्वागतासाठी मनमाड - नगर महामार्गावर सर्वत्र संभाजी पवार व कुणाल दराडे यांनी स्वागताचे फलक व भगवे झेंडे लावले होते. विंचूर चौफुली, शनिपटांगणात सर्वत्र स्वागताचे फलक व भगवे झेंडे लावलेले असल्याने भगवे वातावरण दिसले. शनिपटांगनातील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात त्यांनी भेट देऊन जनतेशी संवाद साधला. यावेळी संपूर्ण पटांगण गर्दीने भरले होते.

शिवसेना पक्षाच्या चिन्हावर हे निवडून आले. अडचणी वाढू लागताच आता गद्दारी करून पळाले आहेत. एकदाचं होऊन जाऊ द्या, राजीनामे द्या आणि निवडणुकीला सामोरे जाऊन दाखवा. तुम्ही जिंकले तर आम्हाला जनतेचा कौल मान्य राहील. मात्र, जिंकणार स्व.बाळासाहेबांची शिवसेनाच. तरीही गेल्या घरी सुखी रहा, पण एकदा निवडणुकीला सामोरे जा, असे प्रतिपादन प्रतिपादन शिवसेनेचे युवा सेना प्रमुख, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

मी फक्त बंडखोरांच्या मतदारसंघात जात आहे. मात्र येथे कुणाल दराडे यांच्या आग्रहाने आलो आल्याचे ठाकरे प्रारंभी म्हणाले. शिवसेनेच्या धनुष्य बाण चिन्हावर निवडून आलेले ४० आमदार, १२ खासदार गद्दारी करून गेले असून त्यांनी राजीनामा देवून एकदा निवडणुकीला सामोरे जा. बेकायदेशीर असलेले हे सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावाही त्यानी केला.शिवसंवाद दौऱ्यानिमित्त येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवसैनिकांशी त्यांनी संवाद साधला.

आतापर्यंत जे बोलायचे आम्हाला उद्धव ठाकरे यांचे द्दल आदर आहे, ठाकरे परिवाराबद्दल आदर आहे, शिवसेनेबद्दल आदर आहे, आता त्यांचा खरा चेहरा समोर येतो आहे. ठाकरे बद्दल त्यांच्या मनातील किती आदर आहे ते पळपुट्या आमदारांनी दाखवून दिल्याची टीका त्यांनी केली.यांना आम्ही तिकिटे दिली, प्रचार केला पक्षाच्या चिन्हावर हे निवडून आले. आता गद्दारी करून पळाले आहेत, तुम्ही अजूनही परत या, मातोश्रीचे दरवाजे तुमच्यासाठी सदैव खुले आहेत, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे अनेक विकासाचे धोरणात्मक निर्णय घेत असताना ज्या माणसाने यांना ओळख दिली, पदे दिली त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि कोविड झाला असताना पक्ष सोडून पळाले असे सांगतानाच निवडणुकीला सामोरे जा, जनता करेल ते मान्य असे खुले आव्हानही त्यांनी दिले.

यावेळी येवला येथील संभाजी पवार, शिवसेना उपनेते सुनील बागुल, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, आमदार नरेंद्र दराडे माजी आमदार कल्याणराव पाटील, संपर्कप्रमुख अल्ताफ खान, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, कुणाल दराडे, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, रुपेश कदम, युवासेना विस्तारक निलेश गवळी, जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे,

तालुकाप्रमुख रतन बोरणारे, शहर प्रमुख राजेंद्र लोणारी, निवृत्ती जगताप, प्रकाश पाटील, शिवा सुरसे, नाना जेऊघाले, प्रवीण नाईक, प्रवीण गायकवाड, भैया भंडारी, छगन आहेर, पुंडलिक पाचपुते, बाळासाहेब पिंपरकर, धीरज परदेशी, अरुण शेलार, लक्ष्मण गवळी, बापू गायकवाड,वाल्मीक गोरे, किशोर सोनवणे, पारस भंडारी, चंद्रमोहन मोरे, भागिनाथ थोरात, दीपक जगताप, बापू काळे, सुधीर जाधव, दिनेश आव्हाड, राहुल लोणारी, कैलास घोरपडे, महिला आघाडीच्या स्नेहलता मांडे, भारती जाधव, सुमित्रा बोटे, साधना घोरपडे,

दिपाली नागपुरे, श्याम गुंड, विजय गोसावी, मकरंद तक्ते, गणेश पेंढारी, संजय सालमुठे, अशोक आव्हाड, अनंता आहेर आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com