भविष्यात 'या' व्यवसायाला असाधारण महत्व

भविष्यात 'या' व्यवसायाला असाधारण महत्व

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

प्लंबिंग व्यवसाय (Plumbing business) हा जलव्यवस्थापनाशी (Water management) व सामाजिक आरोग्याशी (health) संबंधीत आहे त्यामुळे भविष्यात ह्या व्यवसायाला असाधारण महत्व राहणार आहे.

भारतीय रेल्वे (Indian Railways) मध्ये गाडीतील सर्व शौचालयात व्हॅक्युम सिस्टम (Vacuum system) लावणार आहेत त्यामुळे आय.टी.आय. (ITI), प्लंबर (plumber) ला भारतीय रेल्वेत नोकरीच्या संधी आहेत पण त्याच्या कडे ह्या आधुनिक तंत्रज्ञान माहिती असणे गरजेचे आहे. असे प्रतीपादन कौशल्या उद्योजकता विभागाचे उपसंचालक रविंद्र मुंडासे (Ravindra Munde, Deputy Director of Skills Entrepreneurship Department) यांनी केले.

जागतिक शौचालय दिना (World Toilet Day) निमित्ताने महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन (Maharashtra Plumbing Association) तर्फे शासकीय आय टी आय सातपूर (satpur) येथे नाशिक महानगरपालिका अधीकृत प्लंबर आशाताई अहिरे यांचा महिला प्लंबर म्हणुन गौरव उपसंचालक रविंद्र मुंडासे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमांस रविंद्र पाटील, प्लंबर संंघटनेचे अध्यक्ष रवि पाटील उपस्थित होते.

मुंडासे पुढे म्हणाले, प्लांबिंग मित्रांनी ज्ञानाचा स्तर वाढवला तर ते बांधकाम क्षेत्रातील प्लांबिंग साठी ते फायद्याचे असणार आहे. प्लंबिंग क्षेत्रातील होणारे तांत्रिक बदल मुख्यता जलबचत व उर्जाबचत करणारी उपकरण व जल शुद्धीकरणाशी संबधित असणार आहे. मर्यादित जलस्त्रोत, वातावरणातील झालेला बदल,जलप्रदूषण ह्यामुळे भविष्यात शुद्ध पाणी अत्यंत मर्यादित स्वरुपात उपलब्ध असणार आहे.

महाराष्ट्र सरकार सोलर पंप शेतकरीबंधू साठी उपलब्ध करणारा आहे त्यामुळे ग्रामीण भागात प्लंबरला सोलर पंप दुरुस्ती काम माहित असणे हि काळाची गरज असणार आहे. ह्या वर्षीच्या आर्थिक संकल्पात सहा कोटी शौचालय बांधण्यात येणार आहे त्यामुळे ग्रामपातळी वर प्लंबिंग व बांधकाम ह्या दोन्ही गोष्टीचे ज्ञान गरजेचे राहणार आहे.

श्री रविंद्र पाटील म्हणाले की, श्रीमती अहिरे यांना प्लंबर परवाना देताना नाशिक महानगरपालिका अधिकारी व अभियंत्यांनी प्रसंगानुसार नियमात शिथिलता दिली. रवि पाटील यांचे विशेष कौतुक करावे लागेल. त्यांनी महापौरांपासुन ते कारकुणा पर्यंत सर्वांना विनंंत्या केल्या. कार्यक्रमा यशस्वीतेसाठी प्लंबिंग शिक्षक शिवाजी हांडे, वैभव जोशी,सोमनाथ क्षीरसागर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com