
नाशिक । प्रतिनिधी | Nashik
जिल्हा परिषदेच्या (zilha parishad) आरोग्य विभागाच्या (Department of Health) माध्यमातून आता नियमित लसीकरणांमध्ये (vaccination) पोलिओचा (Polio) अतिरिक्त डोस F-IPV (इन 7ऍक्टिव्हेटेड पोलिओ वायरस) देण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी दि.१ जानेवारी पासून सुरू झाली आहे.
नियमित लसीकरण (vaccination) अंतर्गत बालकास जन्मानंतर सहा आठवडे पूर्ण झाल्यावर पहिला डोस तसेच चौदा आठवडे पूर्ण झाल्यावर दुसरा डोस असे एकूण दोन डोस देण्यात येत आहेत. तथापि शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार 1 जानेवारी 2023 पासून F-IPV तिसरा डोस बालकास नऊ महिने पूर्ण झाल्यावर देण्यात येणार आहे. या लसीकरणाचा उद्देश हा पोलिओ उद्रेकाची (Polio outbreak) व्याप्ती मर्यादित ठेवणे तसेच समाजामध्ये सामूहिक प्रतिकार शक्ती वाढविणे असा आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शनानुसार जानेवारी 2023 पासून हा तिसरा डोस नियमित लसीकरणात (vaccination) समाविष्ट करण्यात येत आहे. हा f- IPV लसीचा तिसरा डोस बालकास (childrens) नऊ महिने पूर्ण झाल्यावर देण्यात येणार आहे. सदर डोस नऊ ते बारा महिने या वयोगटातील गोवर रूबेला लसीच्या पहिल्या डोस बरोबर देण्यात येणार आहे याबाबत आरोग्य विभागातील (Department of Health) सर्व स्तरावर प्रशिक्षण देण्यात आलेले आहेत.
तरी सर्व पालकांनी डोस मधील बदल लक्षात घेऊन आपल्या मुलांचे वयोगटा प्रमाणे बालकांना त्यांच्या वयाच्या सहा आठवडे पूर्ण झाल्यावर 14 आठवडे पूर्ण झाल्यावर आणि नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर पहिला दुसरा व तिसरा असे तीन डोस जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (Chief Executive Officer Ashima Mittal), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हर्षल नेहते, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.कैलास भोये,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ युवराज देवरे ,डॉ सचिन खरात,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.