जिल्हा बॅंकेकडून सामोपचार कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ

जिल्हा बॅंकेकडून सामोपचार कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून ( Nashik District Central Co-operative Banks )आकर्षक सामोपचार कर्ज परतफेड ( Loan Repayment ) योजनेस ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे,अशी माहिती बँक प्रशासन नातर्फे देण्यात आली.

मागील ३-४ वर्षापासून नैसर्गिक आपत्ती जसे अतिवृष्टी व गारपीट,वादळे व शेतकरी सभासदांमध्ये कर्जमाफी योजनेबाबत असलेल्या सम्रमावस्थेमुळे तसेच करोना प्रार्दुभावामुळे वि का. संस्थेच्या व बँकेचे थकबाकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी संस्थाची व बँकेचे एनपीए मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे सदर थकबाकीदारांना थकबाकी वसूल देण्यासाठी प्रोत्साहनात्मक बाब म्हणून बँकेने दिनांक २७ मे २०२० च्या संचालक मंडळ सभेत निर्णय घेऊन नवीन सुधारीत आकर्षक सामोपचार कर्ज परतफेड योजना २०२० राबविण्यास नाबार्ड व सहकार आयुक्त कार्यालयाचे मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन मान्यता दिली होती. सदर योजनेची अंतिम मुदत दिनांक ३० जून २०२१ पर्यत होती.

परंतु,या योजनेची अंतिम दिनांकानंतरही जिल्हाभरातील अनेक संस्थानी व सभासदांनी सदरची सामोपचार परतफेड योजना परत सुरु करण्याबाबत मागणी केल्यामुळे बँकेनेही असलेल्या थकबाकीचे कालनिहाय व रक्कम निहाय विगतवारीचा तसेच मोठ्या प्रमाणावरील एन.पी.ए.चा विचार करून सदरची सुधारीत आकर्षक सामोपचार कर्ज परतफेड योजनेस दिनांक ३१ऑक्टोबर २०२१ पावेतो मुदतवाढ देण्याबाबतचा सकारत्मक निर्णय घेतला आहे.

खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे दि. ३०जून २०१६ अखेर थकबाकीत असलेल्या सभासदांकरीता आकर्षक सामोपचार योजना जाहीर केली आहे.जास्तीत जास्त पात्र थकबाकीदारांनी सदर योजनेत भाग घेण्यासाठी आपल्या संबधीत शाखेत संपर्क करून सामोपचार कर्ज परतफेड योजनाची माहिती घेऊन कर्जमुक्त होण्याबाबत बँकेने आवाहन केले आहे.दि. ३० जून २०१६ अखेरीस विविध कार्यकारी संस्था पातळीवर थकीत असलेले सर्व प्रकारचे शेती व शेती पूरक ( अल्पमुदत,मध्यम मुदत, दीर्घमुदत ) संपूर्ण येणे कर्ज व बँकेमार्फत वितरीत केलेल्या थेट कर्ज पुरवठा योजनेअंतर्गत थकीत झालेले सर्व थकबाकीदार सभासद या योजनेस पात्र राहतील.

कर्जदाराकडील थकीत कर्जाची थकबाकी झाल्यापासून पुढे होणाऱ्या एकूण व्याज रकमेवर खालील तपशिलाप्रमाणे व्याज सवलत म्हणून मिळेल.

एक लाखापावेतो ५०टक्के किंवा ७५हजार यापैकी जे कमी असेल ते.एक लाख ते तीन लाखाचे आंत पन्नास टक्के किंवा १.५०लाख यापैकी जे कमी असेल ते.तीन लाख ते पाच लाखाचे आत पन्नास टक्के किंवा २.५०लाख यापैकी जे कमी असेल ते.पाच लाख ते दहा लाखाचे आत पन्नास टक्के किंवा ३.५०लाख यापैकी जे कमी असेल ते.दहा लाखांचे वर पन्नास टक्के किंवा ४.५०लाख यापैकी जे कमी असेल ते.

त्याचप्रमाणे दिनांक ३० जून २०१७ अखेर थकबाकीत असलेल्या सभासदांना त्यांच्या कडील थकबाकी भरणेसाठी त्यांच्या थकखात्यावर होणारे व्याजात चार टक्के सवलत देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला असून दिनांक ३० जून २०१७ अखेरच्या थकबाकीदारांना सदर चार टक्के व्याज सवलत योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याबाबत बँकेच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com