डिसेंबर महिन्यातील धान्यवाटपास मुदतवाढ

डिसेंबर महिन्यातील धान्यवाटपास मुदतवाढ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनाचा corona प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने शासनाने मोफत धान्य वितरणास Free grain distribution पुन्हा सुरुवात केली आहे. परंतू पंजाबमधील आंदोलनामुळे धान्य वेळेवर पोहचू न शकल्याने महिना उलटूनही कार्डधारकांना अद्यापही धान्य मिळाले नव्हते त्यामुळे रेशनधान्य दुकानदारांना डिसेंबरचे धान्य वाटप करण्यास grain distribution of month December 2021 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सांगितले.

खरं तर दुकानदारांपर्यंतच धान्य उपलब्ध झाले नसल्याने कार्डधारक नव्या वर्षातही मोफतच्या धान्यापासून वंचित राहतो की काय, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दुकानदारांनीही विलंबाने धान्य मिळत असल्याने त्याच्या वितरणाचीही मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडे केली होती.

करोना संकटात शासनाने रेशनवरील धान्य मोफत देण्याची योजना सुरू केली. त्यात एका व्यक्तीस 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ दिले जात आहे; परंतु सप्टेंबर-ऑक्टोबरनंतर मोफतच्या धान्य योजनेला मुदतवाढ आलीच नाही. त्यामुळे हे धान्य बंद झाल्याचे बोलले जात होते; पण आता पुन्हा विदेशासह भारतातही कोरोना वाढीस सुरुवात झाल्याने शासनाने मोफतच्या धान्य योजनेस 2022 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

असे असले तरीही नोव्हेंबरचेच धान्य लाभार्थ्यांना देण्यात आले असून, डिसेंबरचे धान्य त्याच महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात देणे अत्यावश्यक असतानाही महिना उलटला. डिसेंबरचे धान्य मिळालेले नाही. तर जानेवारी सुरू झाल्याने याही महिन्याचे धान्य मिळणे आवश्यक आहे; पण दोन्ही महिन्यांचे मोफतचे धान्य वितरण एकाच वेळी करणेही वेळखाऊ आहे. त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर मागील महिन्याचे मोफतचे धान्य आणि ते वितरणासाठी 31 जानेवारीची मुदत मिळावी, तशी मागणीही जिल्हा पुरवठा अधिकार्यांकडे केली होती त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com