सामोपचार कर्जफेड योजनेस मुदतवाढ

जिल्हा बँकेचा निर्णय, सभासदांना आवाहन
सामोपचार कर्जफेड योजनेस मुदतवाढ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (Nashik District Central Co-operative Bank) आकर्षक सामोपचार कर्ज परतफेड योजनेस (Compromise Debt Repayment Scheme) दि. 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.ज्या थकबाकीदार सभासदांनी अजूनही बँकेच्या समोपचार कर्ज परतफेड योजनेत सहभाग घेतलेला नाही,त्या थकबाकीदार सभासदांनी या योजनेत सहभागी होऊन सामोपचार कर्ज परतफेड योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे.

मागील 3-4 वर्षापासून नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी व गारपीट,वादळे व शेतकरी सभासदांमध्ये कर्जमाफी योजनेबाबत असलेल्या संभ्रमावस्थेमुळे तसेच करोना प्रार्दुभावामुळे वि का. संस्थेच्या व बँकेचे थकबाकीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. परिणामी संस्थाची व बँकेच्या एनपीए मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे थकबाकीदारांना थकबाकी वसूल देण्यासाठी प्रोत्साहनात्मक बाब म्हणून बँकेने निर्णय घेतला.

त्यामध्ये नवीन सुधारीत आकर्षक सामोपचार कर्ज परतफेड योजना 2020 राबविण्यास नाबार्ड व सहकार आयुक्त कार्यालयाचे मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन मान्यता दिली होती. सदर योजनेची अंतिम मुदत दि.30 जून 2021 पर्यत होती.परंतु, या योजनेच्या अंतिम दिनांकानंतरही जिल्हाभरातील अनेक संस्थानी व सभासदांनीही सामोपचार परतफेड योजना परत सुरु करण्याबाबत मागणी केली.यामुळे बँकेनेही असलेल्या थकबाकीचे कालनिहाय व रक्कम निहाय विगतवारीचा तसेच मोठ्या प्रमाणावरील एनपीए चा विचार करून सदरच्या सुधारीत आकर्षक सामोपचार कर्ज परतफेड योजनेस दि. 30 जून 2022 पावेतो मुदतवाढ देण्याचा निर्णय वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतला.

सामोपचार कर्ज परतफेड योजनेची अंतिम मुदत दि.30 जून 2022 रोजी संपत असल्याने ज्या थकबाकीदार सभासदांनी अजूनही बँकेच्या समोपचार कर्ज परतफेड योजनेत सहभाग घेतलेला नाही,त्या थकबाकीदार सभासदांनी 30 जून 2022 पर्यंत योजनेत सहभागी होऊन सामोपचार कर्ज परतफेड योजनेचा लाभ घ्यावा. जेणेकरून सदर सभासद हे सामोपचार कर्ज परतफेड योजनेपासून वंचित राहू नये. याकरिता योजनेस पात्र थकबाकीदारांनी सदर योजनेत भाग घेण्यासाठी आपल्या संबधीत विका सेवा संस्था, शाखेत संपर्क करून सामोपचार कर्ज परतफेड योजनाची माहिती घेऊन कर्जमुक्त होण्याबाबत बँकेने आवाहन केले आहे.

तसेच दि. 30 जून 2017 अखेर थकबाकीत असलेल्या सभासदांना त्यांच्या कडील थकबाकी भरण्यासाठी त्यांच्या थकखात्यावर होणार्‍या व्याजात चार टक्के सवलत देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. दि. 30 जून 2017 अखेरच्या थकबाकीदारांना सदर चार टक्के व्याज सवलत योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याबाबत बँकेच्यावतीने आवाहन केले आहे.

यांना मिळणार लाभ

दि. 30 जून 2016 अखेरीस विविध कार्यकारी संस्था पातळीवर थकीत असलेले सर्व प्रकारचे शेती व शेती पूरक (अल्पमुदत, मध्यम मुदत, दीर्घ मुदत) संपूर्ण येणे कर्ज व बँकेमार्फत वितरीत केलेल्या थेट कर्जपुरवठा योजनेंअंतर्गत थकीत झालेले सर्व थकबाकीदार सभासद या योजनेस पात्र राहतील.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com