कॅन्टोन्मेंट सदस्य नियुक्तीला मुदतवाढ

कॅन्टोन्मेंट सदस्य नियुक्तीला मुदतवाढ

दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

फेब्रुवारी 2021 मध्ये मुदत संपलेल्या देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डांवर cantonment boards व्हॅरीड बोर्डाची नियुक्ती करून त्यात नेमण्यात आलेल्या प्रतिनिधींची मुदत संपत आल्याने रक्षा मंत्रालयाने 7 फेब्रुवारीच्या राजपत्रात अधिसूचना जाहीर करत विद्यमान सदस्यांना 10 फेब्रुवारीपासून पुढे सहा महिन्यांची किंवा नवीन बोर्ड अस्तित्वात येण्यापर्यंत मुदतवाढ Extension दिली आहे. त्यामुळे देवळालीत प्रीतम आढाव यांचा कार्यकाळ वाढला आहे.

कॅन्टोन्मेंट कायदा 2006 कलम 13 उपकलम 3 नुसार देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डांवर कायद्यातील तरतुदीनुसार नागरी प्रतिनिधी नेमणेबाबत तरतूद असल्याने त्यानुसार नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये देशभरातील 56 कॅन्टोन्मेंट बोर्डांवर असे सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत.

देवळालीत भाजपच्या अनुसूचित जाती-जमाती उपाध्यक्षा प्रीतम आढाव यांची नियुक्ती झाली असून त्यांनी जोरदारपणे कामाला सुरूवात केली आहे. मात्र ही मुदत 10 फेब्रुवारी रोजी संपत असल्याने रक्षा मंत्रालयाने अधिसूचना जाहिर करत 56 कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सदस्यांना 11 फेब्रुवारी 2022 पासून मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे जुलै 2022 नंतर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका होऊ शकतात. किंवा कायद्यातील तरतुदीनुसार पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढही मिळू शकते.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नियुक्त सदस्यांना कायद्यातील तरतुदीनुसार सहा महिने अथवा पुढील निवडणूका होईपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. आपणास आतापर्यंत केवळ तीन महिन्यांचा कालावधी मिळाला. त्यात मी केंद्र व राज्य सरकारकडे देवळालीतील विविध प्रश्नांसाठी प्रस्ताव सादर केलेले आहेत. त्यांची पूर्तता करण्यासाठी मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी प्रयत्नशील आहे. खा. हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून दिल्लीतील कामे मार्गी लावले जात आहेत.

प्रीतम आढाव, कॅन्टोन्मेंट बोर्ड सदस्या

Pritam Adhav, Cantonment Board Member

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com