निमा प्रतिनिधी निवडीसाठी मुदतवाढ

निमा प्रतिनिधी निवडीसाठी मुदतवाढ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (NIMA) सात सदस्यांची नियुक्ती अंतिम टप्यात आली असली तरी मंगळवारपर्यंत निश्चिती न झाल्याने सामंजस्याने प्रश्न सुटण्यासाठी धर्मादाय सहआयुक्तांनी आता 30 नोव्हेंबरपर्यंत वाढीव मुदत उद्योजकांना दिली आहे.

सर्वांचे एकमत होऊन सात नावे लवकरच अंतिम होतील, अशी आशा विविध गटांच्या प्रमुखांनी व्यक्त केली आहे. निमा कार्यकारिणीच्या निवडणुकीत जवळपास अडीच वर्षांपूर्वी राजकारण झाले आणि प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते. तेथून मिळालेल्या निर्देशांनुसार धर्मादाय आयुक्तांनी सहआयुक्त कार्यालयाने तीन फिट पर्सनची नियुक्ती केली आहे. त्यांच्या माध्यमातून सात प्रतिनिधी नियुक्त करण्यासाठी इच्छुकांकडून दीड वर्षापूर्वी अर्जही मागविले होते..

याकरिता 40 उद्योजकांनी अर्ज केले होते, त्यापैकी 1 अर्ज अवैध ठरला असून 39 अर्ज वैध ठरले आहेत. त्यांतील निवड प्रलंबीत असल्याने या अर्ज केलेल्या 40 जणांतून उद्योजकांनीच एकमताने 7 जणांची नावे द्यावीत, असा सल्ला दिला. याकरिता बुधवारची (दि. 16) मुदत अंतिम ठेवण्यात आली होती. मात्र सिन्नरच्या उद्याजकांच्या हटवादी भूमिकेमुळे उद्योजकांच्या बैंठकीत एकमत होऊ शकले नाही.

त्यामुळे आता सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी पुढील सुनावणी 30 नोव्हेंबरला ठेवत तोपर्यंत तडजोडीतून सात नावे देण्याचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे, निमात सुरू घटनेचा तिढा सोडवत, निवडणुकीपर्यंतच्या कामाची महत्त्वाची जबाबदारी या नियुक्त सदस्यांवर राहणार असल्याने या नियुक्तीला विशेष महत्त्व आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com