मागास विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ

मागास विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या (Social Justice Department) धर्तीवर इतर मागास बहुजन कल्याण विभागाने सन २०१९-२० पासून विमुक्त जाती- भटक्या जमाती (VJNT), इतर मागास प्रवर्ग (OBC) व विशेष मागास प्रवर्ग (SBC) यांच्यासाठी परदेश शिष्यवृत्ती योजना (foreign scholarship scheme) सुरू केली आहे...

या योजनेंतर्गत २०२१-२२ शैक्षणिक वर्षाकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत १ ऑगस्ट पर्यंत आहे. या योजनेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभाग (पुणे) चे संचालक दे. आ. गावडे (D. A. Gawde) यांनी केले आहे.

या शिष्यवृत्तीत परदेशात पदव्युत्तर पदवी (Postgraduate degree) आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाच्या (Ph.D.) अध्ययन करण्यासाठी दहा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी.साठी जागतिक स्तरावर २०० च्या आतील रँकला परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती (scholarship) मंजूर करण्यात येणार आहे.

योजनेचा लाभ एका कुटुंबातील एकाच विद्यार्थ्यास फक्त एकदाच घेता येईल. एकाच कुटुंबातील एका पेक्षा जास्त मुलांना ही शिष्यवृती लागू राहणार नाही. यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तसे प्रतिज्ञापत्र करुन देणे बंधनकारक असणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com