परदेशी शिष्यवृत्तीला मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

परदेशी शिष्यवृत्तीला मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत परदेशी शिक्षणासाठी (abroad) देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीला (Scholarship) अर्ज (Application) करण्यास विद्यार्थ्यांना (Students) मुदतवाढ (Extension) देण्यात आली आहे...

आता या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना दि. ९ नोव्हेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहे.

परदेशामध्ये उच्च शिक्षण (Higher education) घेण्याची अनेक विद्यार्थ्यांची इच्छा असते. गुणवत्ता असूनही अनेकदा आर्थिक परिस्थितीअभावी विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जाऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण केवळ पैशांमुळे अर्धवट राहू नये व त्यांना चांगल्या संधी मिळाव्यात,

तसेच गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाची संधी मिळावी यासाठी साठी उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत २०१८ पासून ही शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यास उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत एक नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती.

परंतु, ही मुदत आता वाढविण्यात आली असून, विद्यार्थ्यांना ९ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने यासाठी अर्ज दाखल करता येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com