द्राक्ष हंगाम लांबणीवर?

पावसामुळे बहार छाटणीत अडथळा
द्राक्ष हंगाम लांबणीवर?

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

द्राक्षवेलींची ऑक्टोबर छाटणी (pruning) सततच्या पावसामुळे (rain) लांबली असून पिक संंंरक्षणाचा खर्च (Cost of crop protection) वाढला आहे.

त्यामुळे टप्प्या टप्प्याने द्राक्ष (grapes) आता एकाच वेळी बाजारात येण्याची शक्यता निर्माण झाली असून फेब्रुवारी अखेरपर्यंत यंदा द्राक्षाची प्रतीक्षा ग्राहकांना करावी लागणार आहे. गेल्या दोन वर्षाच्या कालखंडात करोना (corona) विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शेती व शेती उत्पादनाची वाट लागली.

पिकांचे उत्पादन घेऊन मातीमोल भावाने शेती पिके विकावी लागली. यंदा सुरवातील चांगला पाऊस (rain) झाल्यानंंतर शेती उत्पादनातून चांगला फायदा होईल. या शेतकर्‍यांनी द्राक्ष बागा (Vineyards) लावल्या. मात्र करोना (corona) गेला असला तरी निसर्गाने शेतकर्‍यांची (farmers) पाठ सोडली नाही. अजुनही पाऊस परतीचे नाव घेत नाही.

द्राक्षपंढरीत अजूनहीे पाऊस सुरुच आहे. त्यामुळे ऑक्टोंबर होणारी बहार छाटणी अजुन सुरुच झाली नाही. त्यातच द्राक्षवेली सततच्य पावसामुळे (monsoon) कमजोर होत आहे. त्यामुळे पिक संरक्षणाचा फ़वारणीचा खर्च प्रचंंड वाढला आहे. साधारणपणे ऑक्टोबर छाटणीचा सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर या तीन महिन्यात चालतो. अनेक शेतकरी (farmers) ऑक्टोबरमध्ये पाच- दहा दिवसाच्या अंतराने छाटणी करतात. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांची (Grape growers) द्राक्ष एकाच वेळेस काढणीला येतात.

डिसेंबरपासून द्राक्ष बाजारात येतात. काही द्राक्ष उत्पादक शेतकरी (Grape growers) एक तर अगोदरच छाटणी करतात नाहीतर उशीरा छाटणी करून उत्पादन घेतात. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक फायदा होण्याची असते. यंदा मात्र लांबलेल्या पावसामुळे त्यां सर्वांचेच वेळेचे गणित बिघडले आहे. सप्टेबर ऑक्टाबेरमध्ये े होणारी छाटणी अजुन अनेक ठिकाणी झालेली नाही.

त्यातच इतरवेळी एकरी दहा टन येणारे उत्पादनही यंदा येते की नाही? याचीच त्यांना चिंता आहे. नाशिकमध्ये साधारण डिसेंबर अखेरपासून द्राक्ष बाजारात विक्रीस दिसू लागतात. यंदा मात्र डिसेंबरला दिसणारी द्राक्ष दिसतील. त्यानंतर मार्च ते मे अखेरपर्यंंत एकाच वेळी द्राक्षे बाजारात येतील.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com