शिष्यवृत्तीसाठी मुदत वाढवा; राष्ट्रवादीचे अप्पर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

शिष्यवृत्तीसाठी मुदत वाढवा; राष्ट्रवादीचे अप्पर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

शासनाच्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेतील (National Scholarship Examination) पात्र ओबीसी समाजाच्या (OBC Community) विद्यार्थ्यांना (students) शिक्षणासाठी (education) दरमहा मिळणार्‍या शिष्यवृत्तीस आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास तांत्रिक कारणाने झालेल्या विलंबाने मुकावे लागणार आहे.

यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या उद्भवणारी अडचण लक्षात घेता कागदपत्रे जमा करण्यास मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव दिनेश ठाकरे (Nationalist Youth Congress State Secretary Dinesh Thackeray) यांनी केली आहे.

अप्पर जिल्हाधिकार्‍यांना (Upper Collector) राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकारी तसेच ओबीसी विद्यार्थ्यांच्या पालकांनी निवेदन (memorandum) देत तांत्रिक अडचणींमुळे कागदपत्रे जमा करण्यास उद्भवलेल्या अडचणींकडे लक्ष वेधण्यात आले. शासनातर्फे आठवीसाठी आयोजित राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेचा (National Scholarship Examination) निकाल जाहीर झाला असून पात्र विद्यार्थ्यांना आधारकार्ड (Aadhar Card) मोबाईल क्रमांकाशी लिंक करणे गरजेचे होते.

मात्र अनेक विद्यार्थी गरीब असल्याने त्यांच्याजवळ मोबाईल (mobile) नाही तसेच काही विद्यार्थ्यांनी उसनवारीने मोबाईल घेत त्यांचे नंबर लिंक केले परंतु यातच पंधरा दिवस उलटले. यातच वेबसाईट ओपन होत नसल्याने कागदपत्रे जमा करता आलेली नाहीत. पात्र विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे जमा करण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंतच आहे. त्यामुळे तांंत्रिक अडचणींमुळेच पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीस (Scholarships for students) मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गोरगरीब ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना दरमहा शिक्षणासाठी मिळणार्‍या एक हजार रुपये शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा या दृष्टिकोनातून कागदपत्रे जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांना मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी ठाकरे यांनी यावेळी बोलताना केली. नायब तहसीलदार डॉ. व्यंकटेश यांनी सदर निवेदन स्वीकारले. शिष्टमंडळात कार्याध्यक्ष अनंत भोसले यांच्यासह राष्ट्रवादी पदाधिकारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com