हापूस आंब्याची लासलगावहून परदेशवारी

हापूस आंब्याची लासलगावहून परदेशवारी
रत्नागिरी हापूस आंबा

लासलगाव । वार्ताहर | Lasalgaon

कोकणच्या (Konkan) हापूस आंब्याची (Hapus Mango) परदेशवारीही 12 एप्रिल पासून लासलगाव (lasalgaon) मार्गे सुरू झाली आहे. या हंगामात 360 मॅट्रिक टन आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून न्यूयॉर्क (New York), कॅलिफोर्निया (California), सॅन फ्रान्सिस्को (San Francisco), लॉस एंजेलिस (Los Angeles), शिकागो (Chicago) याठिकाणी आंबा निर्यात (Mango export) झाला आहे.

करोनाचा (corona) प्रादूर्भाव कमी झाल्याने कोकणच्या हापूस आंब्याची निर्यात लासलगावमार्गे अमेरिकेत (America) झाली आहे. येथील भाभा अणु संशोधन केंद्रातून (Bhabha Atomic Research Center) अल्फान्सो, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत, हापूस या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन 360 मॅट्रिक टन आंबे अमेरिकेला रवाना झाले आहे. सन 2019 च्या तुलनेत आंबा निर्यातीत 325 मे टन ने घट झाल्याचे दिसत आहे.

यंदा ऑस्ट्रेलिया (Australia) मध्ये आंबा निर्यात (Mango export) न झाल्याने निर्यातीत घट झाल्याचे दिसत आहे. या निर्यातीमध्ये जर आपण विचार केला तर यंदा लासलगावमार्गे झालेली सगळी निर्यात एकट्या अमेरिकेत झाली आहे. किरणोत्सर्ग स्त्रोत फूड प्रोसेसिंग (Radiation source food processing) देशातील चार प्रमुख यंत्रणाना उपलब्ध करून दिले जात असून यामध्ये जिल्ह्यातील लासलगाव (lasalgaon), गुजरात (gujrat) मधील वापी आणि अहमदाबाद (Ahmedabad) तसेच कर्नाटक (Karnataka) मधील बेंगलोर (Bangalore) येथील केंद्रांचा समावेश आहे.

प्रक्रिया करून आंबे विमानाने पाठवले जात आहे. यात पहिल्यांदा भारतीय केशर आंब्याची समुद्रामार्गे परदेशवारी झाली आहे. नाशिक येथील हेमंत सानप या निर्यातदाराने धाडस दाखविले आहे. त्यामुळे पुढील वर्षी आंबा निर्यातीत आणखी वाढ होईल अशी अपेक्षा आंबा उत्पादक व निर्यातदार व्यक्त करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com