बाटलीत सॅनिटायझर भरताना स्फोट : एकाचा मृत्यू

सॅनिटायझर
सॅनिटायझर

नाशिक रोड | Nashik road

गॅसच्या ओट्यावर बाटलीत सॅनिटायझर भरताना स्फोट झाल्याने एकाचा मृत्यू झाला आहे.

उपनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या मातोश्री नगर येथे राहत्या घरी अनिल जयंतीलाल सुचक ( 56) यांच्या घरातील गॅसच्या ओट्यावर पाच लिटरच्या कॅनमधून छोट्या बाटलीत सिनिटायजर भरत असताना भडका झाला.

त्यामुळे छातीला पोटाला मांडीला भाजल्याने त्यांना उपचारा साठी दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू ची नोंद करण्यात आली

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com