इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठी तज्ज्ञ सल्लागार

इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठी तज्ज्ञ सल्लागार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सतत वाढणारे इंधन दर लक्षात घेत राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहन धोरण Electrical Vehicles Policy जाहीर केले आहे. या योजनेंतर्गत शहरात 106 ठिकाणी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन charging Station उभारण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. त्यासाठी तज्ज्ञ एजन्सीची Expert Consultant for Electric Charging Station नियुक्ती केली जाणार असून या एजन्सीमार्फत मास्टर प्लॅन तयार केला जाणार आहे.

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राप्रमाणे राज्य शासनानेही ‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021’ जाहीर केले असून या निर्णयाची 1 एप्रिल 2022 पासून अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यात शहरांतर्गत सर्व शासकीय, निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत व शासनाच्या निधीतून खरेदी करण्यात येणारी वाहने इलेक्ट्रिक असणार तसेच शासकीय व खासगी जागांवरही चार्जिंग स्टेशन्स उभारणार आहे.

खासगी व्यावसायिक संकुलांमध्ये, स्मार्ट पार्किंगच्या जागेत तसेच मोक्याच्या ठिकाणी असलेल्या खासगी जागांवरही इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी माहिती संकलित करण्याच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी विद्युत व यांत्रिकी विभागाला दिल्या आहेत.

दरम्यान, महापालिकेने 25 पेक्षा जास्त सदनिका असलेल्या निवासी इमारती तसेच व्यावसायिक इमारतींसाठी बांधकाम परवानगी देताना इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची अट घातली आहे. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत उभारलेल्या स्मार्टी पार्किंगच्या ठिकाणीही 106 जागांवर चार्जिंगची सुविधा दिली जाईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com