‘सही पोषण - देश रोषण’मध्ये प्रदर्शन

‘सही पोषण - देश रोषण’मध्ये प्रदर्शन

ठाणगाव । वार्ताहर Thangaon

सुरगाणा तालुक्यातील (Surgana Taluka) बार्‍हे एकात्मिक बालविकास प्रकल्पात जि. प.च्या महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी अनिल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सही पोषण - देश रोषण कार्यक्रम संपन्न झाला.

पोषण माह (Nutrition Month) व मासिक सभेचे आयोजन केले होते. अंगणवाडी पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविकांनी (Anganwadi workers) यांनी बांबू (वास्ती), शेवग्याची कोवळी पाने, आळू, तेरा, कुरडू, कोयची (कंद), दिहगडी अशाप्रकारे विविध जंगलातील पौष्टिक रानभाज्या, शेंगदाणा लाडू, नागलीचे लाडू, बांबू (वास्ती), कूरडू, डांगर, शेवगा थालीपीठ, शेवगा पराठा, नागलीची भाकर, शेवग्याची पोळी, शेंगदाणा गुळ पोळी अशा विविध प्रकारचे पौष्टिक पदार्थाचे (Nutrient) प्रदर्शन मांडण्यात आले होते.

ते बघून सभापती अश्विनी आहेर व अधिकारी यांनी रानभाज्या व पौष्टिक आहाराचा (Nutritious diet) आस्वाद घेतला. कुपोषणावर (Malnutrition) मात करण्यासाठी पोषण माहमध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. परंतु केवळ पोषण महिन्याच्या पुरतेच नव्हे तर कायमचेच काम करत कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा.

आदिवासी भागातील कुपोषणाला हटवण्यासाठी जंगलातील रानभाज्यांमधील पोषक घटक महत्त्वाचे आहे. प्रत्येक अंगणवाडीतील शालेयपुर्व शिक्षण (Pre-school education) उत्कृष्ट व्हावे हे आपले स्वप्न आहे. करोना काळात अंगणवाडी सेविकांनी अतिशय अडचणींचा सामना करत चांगल्या पद्धतीने काम केले.

अंगणवाडी सेविकांच्या अडचणी केव्हाही सांगा सोडवायला तयार आहे असे मत महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर (Women and Child Welfare Speaker Ashwini Aher) यांनी व्यक्त केले.

सभापती आहेर यांनी सुरगाणा तालुक्यातील धबधब्यांचा राजा अशी ओळख असलेला केळावण येथे नयनरम्य भिवतास धबधबा येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी माजी सभापती मंदाकिनी भोये, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दिपक चाटे यांच्यासह बालविकास प्रकल्प अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी दिपक चाटे, माजी सरपंच परशराम वार्डे, जिल्ह्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका रेखा चौधरी, बार्‍हे, पळसन बालविकास प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com