वावीत अपंग व्यक्तींना घरपट्टी व पाणी पट्टी माफ

पिंपरवाडी ग्रामपंचायतचा उपक्रम
वावीत अपंग व्यक्तींना घरपट्टी व पाणी पट्टी माफ

वावी । वार्ताहर Vavi-Sinnar

ग्रामपंचायतींनी आपल्या उप्तन्नाच्या पाच टक्के हिस्सा दिव्यांगासाठी (handicapped) खर्च करावा असे आदेश शासनाने काढळ्यानंतर पिंपरवाडी ग्रामपंचायतने चक्क अपंग (maimed) आणि दिव्यांग रहीवाश्यांना घरपट्टी आणि पाणी पट्टी कायम स्वरुपी माफ केली असल्याची माहिती सरपंच विजय गायकवाड यांनी दिली.

ग्रामपंचायतने यापुर्वीच गावातील दिव्यांगांना प्रत्येकी 1000 रुपयांची मदत दिली आहे. यावेळी सिन्नर (sinnar) पूर्व भागाचे दिव्यागाचे अध्यक्ष वैभव वेलजाळी उपस्थित होते. यावेळी किसन शेलार, सायली सातभाई, गणेश पवार, चंद्रभान कापसे यांना मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी इंदूबाई गायकवाड, केशरबाई हाडोळे, निर्मला गुरुळे, भिमाजी पवार, अण्णा काकड, बाबासाहेब हाडोळे, सोमनाथ हाडोळे, ग्रामसेवक अमोल सोनवणे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.