ग्रामपंचायत कर्मचारी पदभरतीने आनंदोत्सव

संघटनेने मानले जिल्हा परिषदेचे आभार
ग्रामपंचायत कर्मचारी पदभरतीने आनंदोत्सव

वाजगाव | शुभानंद देवरे vajgaon

.नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाकडून Nashik District Gram Panchayat Employees Union गेल्या काही वर्षांपासून ग्रामपंचायत कर्मचारी १० टक्के आरक्षणातून जिल्हा परिषद सेवा वर्ग -३ च्या पदावर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून पदे भरण्यासाठी Recruitment वारंवार पाठपुरावा करूनही नाशिक जिल्हा परिषदेकडून भरती प्रक्रिया होत नसल्याने कर्मचारी वर्गामध्ये मोठ्याप्रमाणात नाराजीचा सूर निघत होता.

गेल्या कित्येक वर्षांपासून आपण ग्रामपंचायत कर्मचारी म्ह्णून प्रामाणिक काम करत असुन शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी वेळेची पर्वा न करणे, दिवाबत्ती, सफाई, पाणीपुरवठा करता नियमितपणे कामे करत असे याशिवाय सध्या देशावर आलेले कोरोना सारख्या महामारी संकटात आपण नियमित कामावर असुन आपल्याला जिल्हापरिषद कर्मचारी दर्जा मिळत नाही. अश्या विवंचनेत नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी वावरत होता.

गेल्या काही महिण्यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी सेवा जेष्ठता यादीतील प्रथम १ ते १२० कर्मचारी यांना आवश्यक मुळ कागदपत्रे घेऊन प्रत्यक्ष तपासणी कमी बोलण्यात आले होते पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व शासन निर्देशानुसार पुढील प्रक्रिया थांबविण्यात आली आल्याने कर्मचारी वर्गात पुन्हा नाराजी निर्माण झाली.

परंतु नाशिक जिल्हा परिषदेने २० सप्टेंबर २०२१ रोजीचे पत्र जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीना प्राप्त होऊन ग्रामपंचायत कर्मचारी सेवा जेष्ठता यादीतून १० टक्के आरक्षणातून जिल्हा परिषद सेवा वर्ग-३ चे पदे भरण्यासाठी दि.२१ रोजी कर्मचाऱ्यांना अवगत करण्यात यावे असे कळविल्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी कर्मचारी वर्गात उत्साह निर्माण झाला.

या अंतर्गत जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायत कर्मचारी यांना १० टक्के आरक्षणातून जिल्हा परिषद सेवा वर्ग-३ चे ग्रामसेवक व आरोग्य सेवक पदांचे आदेश देण्यात आल्याने मुख्य कार्यकारी लीना बनसोड, उप.मुख्य कार्य.अधिकारी (सा.प्र.) आनंद पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प) रवींद्र परदेसी, आहिरे (जि.आ.अधि.)यांचे नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने आभार व्यक्त केले.

आपण कर्मचारी वर्गावर दाखवलेला विश्वास हा विश्वासच असणार अशी ग्वाही ग्रामपंचायत कर्मचारी संघटनचे नाशिक जिल्हाध्यक्ष सखाराम दुर्गुडे व उपाध्यक्ष उज्वल गांगुर्डे यांनी दिली. यावेळी आदेश मिळालेल्या सर्वच कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

Related Stories

No stories found.