खासगी रुग्णालयांकडून 'इतक्या' रुपयांची जादा आकारणी

खासगी रुग्णालयांकडून 'इतक्या' रुपयांची जादा आकारणी
संग्रहित

नाशिक | Nashik

करोना रुग्णांकडून (Covid Patients) जादा रकमेची बिले (Expensive Bill) वसूल केल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या तक्रारी मुख्य लेखापरीक्षकांमार्फत (Bill Auditors) तपासल्या जात आहेत. तफावत आढळलेली रक्कम पालिकेमार्फत (Nashik NMC) रुग्णालयांना रुग्णास देण्यास सांगितले जात आहे.

आतापर्यंत, खासगी रुग्णालयांनी सादर केलेल्या पाच हजार बिलांची तपासणी (Bill Inspection) केल्यानंतर त्यात ३०० बिलांमध्ये तफावत आढळली आहे. खासगी रुग्णालयांनी (Private Hospital) १९ लाख रुपये अधिकचे घेतल्याचे आले आहे.

ती रक्कम रुग्णांच्या खात्यावर पाठविण्याचे आदेश महापालिकेने दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

महापालिकेच्या लेखाविभागाने (NMC Auditor Department) शहरातील ५३ खासगी रुग्णालयांमधील बिलांची तपासणी सुरू केली. दोन आठवड्यांत महापालिकेच्या नोटिसांना उत्तर देण्यासह बिले लेखापरीक्षकांना सादर करण्याचेे आदेश दिले आहेत.

करोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेत पालिकेने जवळपास १७३ खासगी रुग्णालयांना विशेष कोविड उपचाराकरिता (Special Covid Treatment) परवानगी दिली. शासनाने खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवून येथे सवलतीच्या दरात उपचार करण्याचे निर्देश दिले होते.

शहरातील दोन बड्या कॉर्पोरेट रुग्णालयांत कमी रुग्णसंख्या दाखवली गेल्याच्या संशयामुळे त्यांनाही नोटिसा बजावल्या होत्या.

सोबतच, ५३ खासगी रुग्णालयांना नोटिसा काढून मार्च ते मे २०२१ या महिन्यात रुग्णालयात उपचारासाठी दाखल ८० टक्के सवलतीचे बेड तसेच उर्वरित २० टक्के बेडवरील रुग्णांची देयके, दिवसानिहाय अ‍ॅडमिशन व डिस्चार्जची यादी देण्याचे आदेश होते. त्यास प्रतिसाद देत ५३ पैकी ४४ रुग्णालयांनी बिले सादर केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com