
नाशिक | Nashik
अशोका ग्रुप ऑफ स्कूल मधील (Ashoka Group of Schools) विद्यार्थिनींच्या क्रिकेट (Cricket) संघाने या शैक्षणिक वर्षात नुकतेच जळगाव आणि धुळे या संघांविरुद्ध खेळून आंतरशालेय जिल्हास्तरीय अजिंक्यपद आणि त्यानंतर विभागीय स्तरावरील विजेतेपद पटकावले आहे.
अशोका ग्रुप ऑफ स्कूल्सच्या इतिहासात प्रथमच मुलींच्या १७ वर्षांखालील क्रिकेट संघाची स्थापना करण्यात आली. “मुलींची टीम बनवण्याची आमची ही पहिलीच वेळ असल्याने आम्हाला खरोखर जास्त अपेक्षा नव्हती. तथापि, त्यांनी सातत्यपूर्ण उत्तम कामगिरी करून दाखवली आहे आणि अतिशय संयमी खेळ खेळला आहे, त्यामुळे स्पर्धांमध्ये संघ पुढे जात आहे,” अशी माहिती क्रिकेट मार्गदर्शक आणि अशोका ग्रुप ऑफ स्कूल्सचे सहाय्यक महाव्यवस्थापक (General Manager) डॉ. दिनेश सबनीस यांनी दिली. प्रशासकीय व्यवस्थापक नागेश राजमाने यांनी सहकार्य केले.
संघातील सर्व मुलींच्या कामगिरीचे कौतुक करताना, अशोका ग्रुप ऑफ स्कूल्सचे सचिव श्रीकांत शुक्ला, व्यवस्थापकीय विश्वस्त आस्था कटारिया यांनी सांगितले की, संघाने इतक्या कमी वेळात उत्कृष्ट क्षमता दाखवली आहे आणि त्यांच्या मेहनतीमुळे निश्चितच उच्च विजयाची अपेक्षा आहे. आता राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघात पुढील खेळाडूंचा समावेश आहे.
अवनी अरगडे, काव्या रावल, कार्तिकी गायकवाड, इवा भावसार, प्राणिका भारद्वाज, सिद्धी पिंगळे, धृती पाठक, लावण्या कोचर, आस्मी नाईक, स्वर्णिका बिसेन, अक्षरा जाधव, फातिमा शेख, गार्गी पगार, केया जावळी, निशिका छाबरा