२५ वर्ष सुस्थितीत असणारा एमजी रोड फोडण्याचा घाट

व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर
एमजी रोड
एमजी रोड

नाशिक | Nashik

शहरातील मध्यवर्ती वस्तीत मजबूत रस्ता म्हणून ओळख असलेला मेहेर सिग्नल (Meher Signal) ते महाबळ चौक फोडण्याचा घाट स्मार्ट सिटीने (Smar City) घातलेला आहे. यामुळे लोकप्रतिनिधी, व्यावसायिक यांनी तक्रार करण्यास सुरुवात केलेली आहे.

सुरुवातीला त्र्यंबक नाका (Trimbak Naka) ते अशोक स्तंभ (Ashok Stambh) या रस्त्याचे काम करण्यासाठी लागलेला विलंब लक्षात घेता नागरिक तसेच व्यावसायिकांनी यापुढे होणाऱ्या स्मार्ट सिटीच्या कामांना नाराजी (issatisfied with Smart City works) वर्तवली आहे. अवघ्या एक किलोमीटर अंतरासाठी १७ कोटी रुपयांचा खर्च करून नागरिकांना रस्ता तर चांगला झाला नाहीच उलट हमरस्ता बंद करून ठेवल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप (Great annoyance to the citizens) आणि त्रास सहन करावा लागला होता.


स्मार्ट रोड अशी ओळख असलेला त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ हा रस्ता करण्यास दीड वर्ष लागले होते आणि सध्या वर्दळ असलेल्या मेनरोड (Mainroad) वरील महात्मा गांधी मार्गावरील दहीपुल (dahipul) येथे हे काम सुरु आहे. त्याला देखील विलंब लागत असल्याने व्यवसायिकांसह नागरिक वैतागलेले (Citizens annoyed with businessmen) आहे. असे असतानाच शहरातील मेहेर सिग्नल (break the road) ते महाबळ चौक, रविवार पेठ ते आंबेडकर पुतळा, आंबेडकर पुतळा ते गाडगे महाराज पुतळा या रस्त्यांचे देखील खोदकाम होणार आहे.


कोरोनाच्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर (Nashik Corona Crisis) आणि ऐन पावसाळ्यात हि कामे करणे आवश्यक आहे का ? आता लॉकडाऊन थोडाफार शिथिल (Nashik Unlock) होऊन व्यावसायिक पूर्वपदावर येत असताना व्यावसायिकांचा केंद्रबिंदू असलेला हा रस्ता खोदून कोणाचे भलं होणार ? जर यामधून नागरिकांना तसेच व्यावसायिकांना फायदा होणार नसेल तर मग हा अट्टहास का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सद्या सुस्थितीत असलेल्या या रस्त्यांवर खोदकाम झाल्यास पर्यायी रस्त्यांवर गर्दी होऊ शकते. तसेच व्यावसायिक आणि लोकप्रतिनिधी यांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे काम थांबवावे. अन्यथा नागरिक आणि व्यावसायिक यांचा उद्रेक होईल. मी याबाबत जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांना पत्रव्यवहार करून हे काम थांबवावे असे सांगितले आहे.

- शाहू खैरे, काँग्रेस गटनेता, महापालिका नाशिक


महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या सोबत या विषयावर चर्चा झाली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत कामे करण्यासाठी मेहेर सिग्नल ते महाबळ चौक या रस्त्यावरील पादचारी मार्ग काही काळासाठी खोदण्यात येईल. त्यातून इलेक्ट्रिसिटीच्या केबल टाकण्यात येणार आहे. त्यानंतर ते देखील पूर्ववत करण्यात येणार आहे. या सर्व कामासाठी साधारण दोन महिने लागतील. - -सुमंत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, नाशिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com