रामरथ मार्गावरील विकासकामांची परीक्षा

रामरथ मार्गावरील विकासकामांची परीक्षा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

रामनवमीनंतर ( Ramnavami ) एकादशीच्या दिवशी निघणारी रामरथ व गरुडरथ मिरवणूक (Ramrath and Garudarath procession ) मंगळवारी (दि. 12) निघणार आहे. या मिरवणुकीच्या निमित्ताने स्मार्ट सिटीने ( Smart City )आजपर्यंत केलेल्या रामरथ मार्गावर केलेल्या विकासकामांची ‘परीक्षाच’ होणार आहे. यानिमित्ताने प्रशासनाचा गर्दी काळात मार्गावर येेणार्‍या अडचणींचा अभ्यास होणार आहे.

आज (दि.12) सायंकाळी काळाराम मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात होईल. शेकडो भाविक त्यात सहभागी होतील. धार्मिक विधीनंतर शोभायात्रेला सुरुवात होईल. दोन वर्षाच्या निंर्बंधानंतरची पहिलीच यात्रा असल्याने सनई-चौघडे पथक, झांजपथक आणि ढोल पथक सादरीकरणासाठी सज्ज झाले आहेत.

ही मिरवणूक गंगाघाट, दहीपूल, मेनरोड, बोहरपट्टी, कापडबाजार, म्हसोबा पटांगण मार्गे रामकुंंडावर येईल. पवित्र स्नानानंतर राम मूर्ती पुन्हा मंदिरात नेल्या जातील. नेहरू चौक, कानडे मारुती लेन, चांदवडकर गल्ली, मेनरोड, नवीन दरवाजा अशा विविध भागात रांगोळ्यां काढून पुष्पवृष्टी करून रथाचे स्वागत होईल. हजारो भाविक या निमित्ताने येथे जमतील.

काळाराम मंदिर पूर्व दरवाजापासून नागचौक, चरण पादुका चौक, लक्ष्मण झुला पूल, जुना आडगाव नाका, गणेशवाडी रोड, मरीमाता मंदिर, गंगापात्र म्हसोबा पटांगण, संत गाडगे महाराज पुलावरून, नेहरु चौक, चांदवडकर बाजार, भांडीबाजार, म्हसोबा पटांगण, सांडवा देवी मंदीर, भाजीबाजार, अहिल्याराम व्यायामशाळा, रामकुंड ते परशुराम पुरिया रस्ता, शनिचौक, हनुमान चौक ते काळाराम मंदिर पूर्व दरवाजा या मिरवणूक मार्गावर दुपारपासून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.

या निमित्ताने गेल्या दोन वर्षात स्मार्ट सिंटी कंपनीने पंचवटी व नेहरु चौक परीसरात केलेल्या विकासकामांची परीक्षाच होणार आहे. ज्या विरुध्द स्थानिक नगरसेवक व व्यापारी तक्रारी करत होते त्यांतील वस्तुस्थिती समोर येण्यास यातून मदतच होणार आहे.

Related Stories

No stories found.