Nashik : माजी सैनिकाचा प्रामाणिकपणा; तब्बल एक लाखाचा धनादेश केला परत

Nashik : माजी सैनिकाचा प्रामाणिकपणा; तब्बल एक लाखाचा धनादेश केला परत

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Devali Camp

लहवितचे (Lahavit) माजी सैनिक दशरथ सुकदेव वाघमारे यांना विंचुरीदळवी गावाजवळ एक लाखाचा धनादेश (Check) मिळाला असता तो त्यांनी बँक ऑफ इंडियाच्या (Bank of India) देवळाली कॅम्प शाखेत शाखा व्यवस्थापकांकडे खातेदाराची चौकशी करून परत केल्याने त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, दशरथ वाघमारे हे एका विवाह समारंभासाठी भगुर येथुन घोरवडकडे जात असताना विंचुरी बसस्टॉप जवळील (Vincur Bus Stop) रस्त्यावर त्यांना बँक ऑफ इंडिया या बँकेचा दुर्गा कृषी सेवा केंद्र या नावाने एक लाखाचा बेरर धनादेश सापडला. त्यानंतर त्यांनी सदरचा धनादेश घेऊन देवळाली कॅम्प येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत व्यवस्थापक विजया कुरुप यांच्याकडे दिला.

Nashik : माजी सैनिकाचा प्रामाणिकपणा; तब्बल एक लाखाचा धनादेश केला परत
RBI चे पतधोरण जाहीर; सर्वसामान्यांना मोठा दिलासा, 'असे' आहेत रेपो रेट

यानंतर बँकेने खातेदाराची चौकशी केली असता सदरचा धनादेश आगसखिंड येथील शहीद सैनिक खंडू भागुजी बरकले यांचा असल्याचे समजले. यावेळी दशरथ वाघमारे यांनी बरकले यांच्या परिवाराशी संपर्क साधून शहीद बरकले यांच्या पत्नी व मुलगीसह भाऊ भाऊसाहेब भागुजी बरकले यांच्याकडे धनादेश सुपुर्द केला.

Nashik : माजी सैनिकाचा प्रामाणिकपणा; तब्बल एक लाखाचा धनादेश केला परत
Nashik Accident News : कंटेनरच्या धडकेत दोन जैन साध्वींचा मृत्यू

दरम्यान, देशासाठी शहीद झालेल्या खंडूजी बरकले यांचा एक लाखाचा धनादेश एका माजी सैनिकाला सापडला आणि  दशरथ वाघमारे या माजी सैनिकांनी आपला प्रामाणिकपणा दाखवत परत दिल्याने भगूरसह (Bhagur) परिसरात त्यांचे कोतुक होत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com