माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांना 'यशवंत जीवन गौरव' पुरस्कार जाहीर

माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांना 'यशवंत जीवन गौरव' पुरस्कार जाहीर
यशवंत जीवन गौरव पुरस्काराचे निमंत्रण माजी खासदार प्रताप सोनवणे यांना देताना अध्यक्ष जिभाऊ सोनवणे, सचिव हिरामण सोनवणे, खजिनदार किरण सोनवणे व कार्यकारिणी सदस्य प्रा. बापू सोनवणे आदि.

नाशिक | प्रतिनिधी Nashik

धुळे लोकसभा मतदारसंघाचे (Dhule Loksabha) माजी खासदार (Ex MP) तसेच पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार प्रतापदादा सोनवणे (Pratapdada Sonawane) यांना यशवंत जीवनगौरव पुरस्काराने (Yashwant Jivangaurav Award) सन्मानित करण्यात येणार आहे.....

नाशिक निवासी सोनवणे परिवाराकडून या पहिल्या वहिल्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. माजी खासदार सोनवणे यांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय कार्यकीर्दीबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

पुरस्काराचे वितरण २४ एप्रिल रोजी मखमलाबाद रोड येथील विठ्ठल रुख्मिणी मंगल कार्यालयात नाशिक निवासी सटाण्यातील सोनवणे परिवाराच्या स्नेहमेळाव्यात होणार आहे.

बागलाणच्या माता द्वारका आक्का यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल. यासोबतच परिवारातील विविध क्षेत्रातील गुणवंतांचाही याप्रसंगी सन्मान केला जाणार आहे.

याबाबतची माहिती निवड समिती अध्यक्ष माणिकराव सोनवणे, उपाध्यक्ष चंद्रशेखर सोनवणे, प्रा. बापू सोनवणे, केदा सोनवणे यांनी दिली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिवाराचे अध्यक्ष जिभाऊ सोनवणे, सचिव हिरामण सोनवणे, खजिनदार किरण सोनवणे, डॉ संजय सोनवणे, रमेश सोनवणे, विलास सोनवणे, प्रशांत सोनवणे, शरद सोनवणे, नरेंद्र सोनवणे, अरुण सोनवणे, दिनेश सोनवणे, केदा सोनवणे प्रयत्नशील आहेत.

परिवाराच्या सदस्यांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.