माजी आमदार पंकज भुजबळ यांच्याकडून नस्तनपूर मंदिरात पूजा

माजी आमदार पंकज भुजबळ यांच्याकडून नस्तनपूर मंदिरात पूजा

नाशिक । Nashik

राज्यातील सर्व मंदिर उघडण्याचा निर्णय महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi Sarkar) सरकारच्या वतीने निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे स्वागत करत नांदगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार पंकज भुजबळ (Pankaj Bhujbal) यांनी नांदगाव मतदारसंघातील विविध मंदिरांमध्ये जाऊन पूजा केली. त्यांनी प्रथम प्रसिद्ध देवस्थान नस्तनपूर (Nastanpur) येथे ट्रस्टच्या वतीने मंदिराचे दरवाजे उघडत श्री शनीदेवाचे मंदिर (Shani maharaj Mandir) भाविकांसाठी खुले केले....

यावेळी त्यांनी आरती व पूजन करत दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी नांदगाव (Nandgaon) शहरातील एकविरा देवी मंदिर (Ekvira Devi Mandir) व मनमाड शहरातील नीलमणी गणपती (Neelmani Ganpati Mandir) मंदिरात पूजन करत दर्शन घेतले.

देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांहून अधिक काळापासून मंदिरे बंद होती. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आता हळूहळू सर्व उद्योग, व्यवसाय पूर्ववत झाले असून शाळा देखील उघडण्यात आलेल्या आहे. त्याचपार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या वतीने घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र भरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या नेते व पदाधिकाऱ्यांकडून या निर्णयाचे स्वागत करत मंदिरांमध्ये पूजन करण्यात येत आहे.

त्या पार्श्वभूमीवर आज नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पंकज भुजबळ यांनी आज नांदगाव तालुक्यातील प्रसिद्ध नस्तनपूर मंदिराचे दरवाजे उघडून या निर्णयाचे स्वागत केले. तसेच यावेळी त्यांनी मंदिरात श्री शनिदेवाचे पूजन करत कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर त्यांनी नांदगाव शहरातील एकविरा देवी मंदिर व मनमाड शहरातील नीलमणी गणपती मंदिरात पूजन करत दर्शन घेतले.

Related Stories

No stories found.