खड्ड्यांवरून माजी महापौर आक्रमक

खड्ड्यांवरून माजी महापौर आक्रमक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरातील जवळपास सर्व रस्त्यांवर मोठमोठे खड्डे ( Pits on Road)पडले आहे. मात्र महापालिका प्रशासन त्याबाबत गंभीर दिसत नाही. प्रशासनावर कोणाचाही अंकुश नाही. दरम्यान शहरातील रस्ते त्वरित दुरुस्त न झाल्यास अधिकार्‍यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा माजी महापौर दशरथ पाटील (Former Mayor Dashrath Patil)यांनी दिला आहे.

शहरातील रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेबाबत पंचनामा रस्त्यांचा ही मोहीम माजी महापौर पाटील यांनी सुरु केली आहे. यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की, नाशिक शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था व संपूर्ण शहरात वाढत असलेले रस्त्यांवरील खड्डे या संदर्भात विविध राजकीय पक्ष, नागरिक यांनी प्रशासनाला निवेदने देऊन खड्डे बुजविण्याची मागणी केली आहे. परंतु पावसाळ्याचे कारण देत प्रशासनाला शहराला वेठीस धरल्याचा आरोप केला आहे.

मुंबई आणि पुण्यानंतर नाशिकचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. शहरात मागील सहा महिन्यांपासून महापालिका प्रशासनावर कोणाचाही अंकूश राहिलेला नसल्याने प्रशासन मनमानी कारभार करत असल्याचा आरोप केला. शहरात मुसळधार पाऊस झाला असला तरी आता पाऊस थांंबून बरेच दिवस झाले असतांनाही हे खड्डे बुजविण्याचे काम सुरु करण्यात आलेले नाही. काही ठिकाणी खड्डे बुजविले जातात परंतु ते पॅच दिले जात असल्याने रस्ते अजूनच खराब झाले आहेत.

दि. 1 डिसेंबर रोजी महापालिकेला रस्त्यांच्या दुरुस्तीचा अहवाल न्यायालयात सादर करावयाचा आहे. त्यामुळे 30 नोव्हेंबरपर्यंत ठेकेदारांना रस्ते दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे. महापालिका अधिकार्‍यांनी खड्डे बुजविण्याच्या नावाखाली भ्रष्टाचाराचे दुकान सुरु केले असल्याचा आरोप त्यांनी केला. येत्या काळात पोलीस आयुक्तांनाही भेटून शहरात अपघात झाला तर महापालिका अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com