शेतकर्‍याच्या मुलीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा

आकाशातून दोनशे फुटांवरून अनोखे आगमन
शेतकर्‍याच्या मुलीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा

सातपूर । प्रतिनिधी Satpur

हौसेेला मोल नसते असे म्हणतात, पण त्यातही नाद शेतकर्‍याचा ( Farmer )असेल तर विचारायलाच नको. याचा प्रत्यय नुकताच शहरात झालेल्या एका विवाह सोहळ्याप्रसंगी ( Wedding ceremony)आला.

गंगापूर बालाजी लॉन्स येथे झालेल्या विवाह सोहळ्यात नवरदेव-नवरी चक्क 200 फूट हवेतून गरूडरथातून विवाहस्थळी दाखल (The bride and groom arrived at the wedding venue in an eagle Chariot )झाल्याने विवाहाचा हा नवा प्रवेश पाहून लोकही चकित झाले.

पिंपळगाव बहुला येथील प्रगतिशील शेतकरी सुदाम भावले यांची कन्या नीलम हिचा विवाह अंबड येथील क्रेन व्यावसायिक सुभाष शेळके यांचा मुलगा मोहन याच्याशी ठरला होता.

हा विवाह आगळ्यावेगळ्या पद्धतीने झाला पाहिजे, अशी मुलीचे वडील सुदाम भावले ( Sudam Bahule ) यांनी इच्छा व्यक्त केली होती. याला मुलीचे सासरे सुभाष शेळके आणि बाळासाहेब शेळके यांनी साथ देत नवरदेव-नवरीसह क्रेनद्वारे गरूडरथ 200 फूट हवेतून विवाहस्थळी आणण्यात आला होता.

मुलीचे लग्न कायम स्मरणात राहावे, यासाठी वडील सुदाम भावले आणि भावले कुटुंबीय गेल्या एक महिन्यापासून नियोजन करत होते. यात अनेक अडचणींनादेखील तोंड द्यावे लागले. या गरूडरथातील एन्ट्रीने हा लग्नसोहळा चांगलाच चर्चेत आला असून या कल्पकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या विवाह सोहळ्याप्रसंगी उभय वधू-वरांनी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती केल्यानंतर विवाह विधी पार पडला. कुटुंबाने दिलेले हे सरप्राईज कायम लक्षात राहील, अशी भावना वधू आणि वराने व्यक्त केली.

दरम्यान, या विवाह सोहळ्याप्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी सभागृह नेते दिनकर पाटील, मनसेना शहरप्रमुख दिलीप दातीर, माजी महापौर दशरथ पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावत नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले. याचबरोबर रवी शेट्टी प्रस्तुत आर्केस्ट्रा म्युझिक मेलडीने विविध गाणी सादर करत वर्‍हाडी मंडळींची मने जिंकली.

या विवाह सोहळ्याप्रसंगी दामोदर भावले, कारभारी भावले, उत्तम भावले, विष्णू भावले, पंडित भावले, अरुण भावले, अनिल भावले, अमोल भावले, आदित्य भावले, ओम भावले, स्मिता भावले यांच्यासह भावले आणि शेळके कुटुंबियांनी ही संकल्पना मांडून प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com