गोदेचे सौंदर्य जतन करण्यास सर्वांच्या सहकार्याची गरज: आयुक्त डॉ. पुलकुंडवार

रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्सच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
गोदेचे सौंदर्य जतन करण्यास सर्वांच्या सहकार्याची गरज: आयुक्त डॉ. पुलकुंडवार

पंचवटी | प्रतिनिधी | Nashik

गोदामाय हीच नाशिकची (nashik) खरी ओळख असून तिचे सौंदर्य आणि पावित्र्य जपण्यासाठी महापालिकेतर्फे (municipal corporation) विविध उपाययोजना केल्या जातात.

रोटरी सारख्या संस्थासुद्धा त्यात आपले बहुमोल योगदान देतात ही बाब स्तुत्य असून या पवित्र कार्यात सर्व नागरिकांनाही सहभागी करून घ्यावे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar) यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ नाईन हिल्स (Rotary Club of Nine Hills) आणि सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने "माझी माय गोदा माय” या थीम अंतर्गत छायाचित्र व चित्रकला स्पर्धेतील छायाचित्रे व चित्रांचे प्रदर्शन सावानाच्या औरंगाबादकर सभागृहात भरविण्यात आले असून त्याचे उद्घाटन करतांना पुलकुंडवार बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे (Smart City CEO Sumant More), सावानाचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके, प्रमुख कार्यवाह डॉ.धर्माजी बोडके, रोटरी क्लब नाईन हिल्सचे अध्यक्ष धनंजय बेळे, महंत भक्तीचरणदास, रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नर सीमा पछाडे, सलीम बटाडा, हेमंत खोंड, वैभव चावक, अजय चव्हाण, डॉ.अतुल वडगावकर, विराज पहाडे आदी होते.

नाशिकनगरीला समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा (Historical and cultural heritage) लाभला आहे. तो जोपासण्याचे काम महापालिका करीत आहे. शहर विकासाची जी कामे सुरू आहेत त्यावर नाशिककरांनी बारकाईने लक्ष ठेवावे आणि त्यात काही उणिवा असतील तर त्या आमच्या निदर्शनास आणून दिल्यास आम्हाला त्यात सुधारणा करता येतील. गोदामाय प्रदूषणमुक्त (Pollution free) ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असून रोटरीने भरविलेल्या या प्रदर्शनामुळे देशविदेशातून येणाऱ्या पर्यटकांपर्यंत (tourists) गोदेचे सौंदर्य आणि पावित्र्याबद्दल सकारात्मक संदेश जाईल, असा विश्वासही पुलकुंडवार यांनी व्यक्त केला.

सावानाचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके यांनीही आपल्या भाषणात नाशिकच्या गोदावरी नदीचे (godavari river) महात्म्य विशद करून तिच्या काठावरील काझीगढी आणि हनुमानगढीचा (Hanumangarhi) उल्लेख प्राचीन काळातही आढळतो याची आठवण करून दिली. सावानाचे कार्यालय पूर्वी सरकरवाड्यात होते. पूर आल्यानंतर सरकारवाडा आणि गोदेची भेट हमखास हमखास ठरलेलीच आणि आणि हे दृश्य विलोभनीय असेच असते असे सांगून गोदावरीचे (godavari) महत्व विशद करणारी चित्रकला स्पर्धा सावानातर्फे दरवर्षी घेण्याची घोषणा प्रा.फडके यांनी केली तेव्हा सभागृहात उपस्थित सर्वांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.

गोदावरीच्या देखभाल व स्वच्छतेबाबत विविध माध्यमातून उलट सुलट चर्चा होत असतांनाच तिचे विहंगम दृष्य लोकांसमोर मांडण्याच्या सकारात्मक दृष्टीकोनातून 'माझीमाय गोदमाय' अशी अभिनव छायाचित्र आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याला उदंड प्रतिसाद लाभला. या प्रदर्शनामुळे गोदावरीचे सौंदर्य लोकांसमोर तर येईलच परंतु तिच्या स्वछता व संवर्धनाने महत्वही लोकांना पटेल, असे रोटरी क्लब नाईन हिल्सचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

२०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या जागृतीसाठी हे प्रदर्शन महत्वाची भूमिका बजावेल,असा विश्वास महंत भक्तीचारणदास यांनी व्यक्त केला.अशाप्रकारचे प्रदर्शन कायमस्वरूपी भरवावे,अशी उपयुक्त सूचना रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नर सीमा पछाडे यांनी केला.यावेळी पोस्टमनच्या वेषभूषेत येऊन गोदामाय नाशिककरांना पत्ररुपाने काय सांगते याचे वाचन आपल्या खास शैलीत करून दत्तात्रेय कोठावदे यांनी सर्वांची मने जिंकली. यावेळी त्यांचा तसेच प्रदर्शनासाठी मोलाचे सहकार्य करणारे दीपक वर्मा यांचा आयुक्त पुलकुंडवार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित सर्वाना गोदावरीच्या संवर्धनाची शपथही देण्यात आली. कार्यक्रमास गिरीश नातू. देवदत्त जोशी,संजय करंजकर,सोमनाथ मुठाळ,प्रेरणा बेळे,गणेश बर्वे,राजेंद्र निकम,दिनेश देवरे,दिलीप अहिरे, सुरेश गायधनी, प्रा.ललित पगार,कैलास सोनवणे यांच्यासह विविध मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन विश्वास शिंपी यांनी केले.

प्रदर्शन कालावधी वाढला

खरे तर हे प्रदर्शन १२ आणि १३ नोव्हेंबर असे दोनच दिवस आयोजित करण्यात आले होते.मात्र ते चार दिवसांचे करावे अशी सूचना आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली असता सावानाचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके यांनी ती मान्य केली.त्यामुळे आता हे प्रदर्शन मंगळवार १५नोव्हेंबरपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत जनतेसाठी विनामूल्य खुले राहील,असे आयोजकांनी सांगितले. याच बरोबरीने सार्वजनिक वाचनालयाचे वस्तुसंग्रहालय सुद्धा नाशिककर नागरिकांसाठी १५ नोव्हेंबर पर्यंत खुले करण्यात आल्याचे वस्तुसंग्रहालय सचिव सौ. प्रेरणा बेळे यांनी सांगितले

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com