सामाजिक भान ठेवा

सामाजिक भान ठेवा

येवला | प्रतिनिधी | Yeola

करोना (Corona) अद्याप संपलेला नाही. जगभरात अनेक देशांमध्ये लॉकडाऊन (Lockdown) सुरू आहे. या काळात प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्वाचा आहे. त्यामुळे सर्वांनी आपापली जबाबदारी पार पाडणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्हा पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले....

पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते येवला शहरात 4 कोटी 1 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन पार पडले. त्यावेळी भुजबळ बोलत होते.

यावेळी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सुरज पटणी, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, बाजार समिती प्रशासक वसंत पवार, नगरसेवक दीपक लोणारी, प्रवीण बनकर, राजश्री पहेलवान, प्रांत अधिकारी सोपान कासार, बांधकाम सभापती शेख निसार कार्यकारी अभियंता प्रशांत सोनार, उपअभियंता उमेश पाटील उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, करोनाच्या कालावधीतही आपण विकासाची कामे सुरू ठेवली आहेत. अनेक विकासाची कामे आपल्याला मार्गी लावायची आहे. जी विकास कामे सुरू करण्यात आलेली आहे, ती तातडीने पूर्ण करण्यासाठी शासन सर्वोतोपरीने मदत करीत आहे.

त्या अनुषंगाने शासनाचा प्रतिनिधी म्हणून नागरिकांचे प्रश्न सोडविल्या शिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्याचबरोबर शहर स्वच्छ ठेवणे जेवढी नगरपालिकेची जबाबदारी आहे. तितकीच नागरिकांची आहे. म्हणून प्रत्येक नागरिकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी केले.

पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते वैशिष्ट्यपूर्ण कामे विशेष अनुदान योजनेअंतर्गत येवला शहरातील साई मंदिर परिसरातील हाबडे यांची पाठीमागील बाजु ते शाम पत्रा डेपो बदापूर रोडपर्यंत रस्ता, सुलभानगर येथील कृष्णाय मिसाळ यांचे घर ते घोलप यांचे घर ते कापसे यांचे घरापर्यंत रस्ता, साई मंदिर येथील कैलास बाकळे यांचे घर ते 12 मी. रुंद रस्त्यांपर्यंत रस्ता, साई मंदिर परिसरातील सरगडे यांचे घर ते कैलास देशमुख यांचे घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

तसेच प्राथमिक सोयी सुविधा योजनेअंतर्गत कामांचे भुमीपूजन रमेश खैरे यांच्या घरापासून ते नगर मनमाड रोडपर्यंत, कालिका प्लोअर मिल ते सरकारी कंपाऊड वॉलपर्यत, निकम यांच्या घरापासून ते कदम यांच्या घरापर्यंत, तर श्रीराम शॉपी ते दुकळे यांच्या घरापर्यंत भुमिगत गटार व रस्ता काँक्रीटीकरण या कामांसह सुमारे चार कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com