नदी संस्कृती टिकवण्याची जबाबदारी प्रत्येकाची - डॉ.बस्ते

नदी संस्कृती टिकवण्याची जबाबदारी प्रत्येकाची - डॉ.बस्ते

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सातवहन काळापासून वाहत असलेल्या गोदावरीला पेशवेकाळात कुंडाच्या व घाटांच्या रूपाने सौंदर्य प्राप्त झाले Beauty of Godavari in the form of ponds and ghats during Peshwa period . त्यामुळे गोदावरी किनारी मनुष्य वस्ती विकसित होऊन नदी संंस्कृती बहरत गेली. आता या कुंडांंचे रक्षण व जतन Protection of ponds करण्याची व ही नदी संस्कृती river culture कायमस्वरुपी टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून ती प्रत्येकाने पार पाडावी, असे प्रतिपादन नदीच्या अभ्यासक व तज्ज्ञ डॉ.प्राजक्ता बस्ते Dr. Prajakta Baste यांनी केले.

स्वातंंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक, राज्य पुरातत्त्व विभाग व नाशिक इतिहास संशोधन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कालपासून गोदावरी उत्सवाचे Godavari Festival आयोजन करण्यात आले आहे. दुसरे पुष्प आज डॉ. बस्ते यांनी नदी संंस्कृती या विषयावर गुंंफले. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पुरातत्त्व विभागाच्या सहाय्यक संचालिका आरती आळे होत्या.

डॉॅ. बस्ते यांनी नदी संस्कृतीचे महात्म्य विशद केले. नदीच्या उगमापासून ते त्या का मृत पावतात याचे सविस्तर वर्णन कथन केले.

त्यांनी देश-विदेशातील नद्यांंची माहिती देऊन उत्तर भारत व दक्षिण भारतातील नद्यांमुळेे विकसित झालेल्या शहरांची ओळख करून दिली. भारताला गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, कावेेरी यांच्या संस्कृतीची माहिती दिली. पाणी ही मानवाची मूलभूत गरज असल्याने नदीकाठी मानवी वस्ती बहरत गेली. त्यानंतर मानवी वस्तीमुळेे संस्कृती विकसित झाली.

त्या म्हणाल्या, त्र्यंबकेश्वरला उगम पावलेली गोदावरी नाशिकमध्ये 21 किलोमीटरपर्यंत वाहते. त्यात 17 तीर्थ आहेेत. प्रत्येक तीर्थाला वेगळे महत्त्व आहे. पेशव्यांनी पुण्यानंतर नाशिकला वसाहत करण्यामागे केवळ गोदावरी नदी हेच प्रमुख कारण आहे. पेशव्यांच्या काळात या गोदावरी नदीत कुंड, घाट बांंधले गेले. त्यामुळे सौंदर्य प्राप्त झाले.पाचशे वर्षे होऊनही या घाटांचे दगड जसेच्या तसे आहेत.

आजही नदीकाठ परिसरात वीस विहिरी आहेत. त्या 24 तासांत पुन्हा भरतात हा अनुभव आहे. त्या कधीही आटत नाहीत व आटल्या नाही. भूगर्भतील पाणीसाठ्यामुळे येथील कुंडात सदैव पाणी झिरपत राहते. गोदावरीमुळे नाशिकला धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे गोदावरी कायमस्वरुपी निर्मळ वाहत राहील, यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या शेवटी आकर्षण ठरले ते पोस्टमन काका. या काकांनी चक्क गोदमाईने नाशिककरांच्या वतीने लिहिलेले पत्रच प्राजक्ता बस्तेे यांना देऊन त्यांचे आभार मानले. नाशिककरांनो तुम्ही भाग्यवान आहात. मार्गशिर्ष मासात चौथ्या दिवशी गोदा महात्म्य तुम्हाला ऐकावयास मिळाले, असे ते म्हणाले. डॉ. अजित कापडणीस यांनी प्रास्तावीक केले. स्वागत आरती आळेे यानी केले. यावेळी इतिहास प्रेमी उपस्थित होते.

डॉ. कमोद यांचे आज व्याखान

शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता डॉ.कैलास कमोद यांचे गोदाघाटावरचे नाशिक यावर व्याख्यान सरकारवाड्यातील दरबार हॉलमध्ये होईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com