यांत्रिक युगातही कुंभार समाज जपतोय वारसा

यांत्रिक युगातही कुंभार समाज जपतोय वारसा

लासलगाव । हारूण शेख | Lasalgaon

अर्थव्यवस्थेमध्ये बारा बलुतेदारांची वर्णव्यवस्था असायची. त्यात सोनार, कुंभार, सुतार, लोहार, धोबी, न्हावी, तेली, जंगम, माळी, कोळी, महार आणि गुरव इत्यादी जातींचा समावेश असायचा. अत्याधुनिक जगात (modern world) हे कालबाह्य वाटत असले तरी त्यापैकी बर्‍याच जणांना अजूनही त्या वर्णव्यवस्थेचा अभिमान आहे.

काळानुरुप कात टाकत एक एक समाज आधुनिक होत चालला आहे. सध्या दिवाळी सणाची (diwali festival) लगबग असुन लखलखत्या दिव्यांचा हा सण दिवे (lights) बनवणार्‍या कुंभार (potter) समाजासाठी देखील तितकाच महत्वाचा आहे. साहजिकच निमगाव वाकडा, वेळापूर येथील कुंभार समाजबांधव आजही लासलगावच्या (Lasalgaon) बाजारपेठेत पणत्या, बोळके, चुली आदी प्रत्येक सणाला लागणारे साहित्य बनवून विक्री करतांना दिसत आहे.

गेल्या काही वर्षापासून गावागावांमध्ये गॅस एजन्सी (Gas Agency) सुरू झाल्यावर मातीच्या चुली होत जाण्याचा वेग आणखी वाढला. प्लास्टिकच्या भांड्यांनी मडकी अधिक निरर्थक ठरवली. पारंपारिक व्यवसायावर अवलंबून असणारे मोठ्या प्रमाणात सुशिक्षित होत गेले. मातीची मडकी, भांडी करणे, तिला वाळविणे, नंतर भाजणे किंवा विटा बनवणे वाळवणे, भाजणे ही कामे पावसाळा सोडून इतर काळात करावी लागतात.

त्यामुळे सहा महिन्यातच वर्षभराची कामे करून मिळवलेल्या संचितावर वर्षभर भागवावे लागत असल्याने काटकसरी, योग्य खर्च करुन कुंभार समाज परिस्थिती पचवून नव्या बदललेल्या परिस्थितीला सामोरे जात आहे. पारंपारिक व्यवसाय (Traditional business) करताना येणार्‍या अडचणी आणि उत्पादित केलेली मातीची भांडी, त्यांना मिळणारा मोबदला तसेच व्यवसायातील मागासलेपणा, शासनाकडून कोणतीही सवलत न मिळणे अशा अनेक समस्या या कुंभार समाजासमोर आजही निर्माण झालेल्या दिसून तरीही लासलगाव बाजारपेठेत निमगाव, वेळापूर या ठिकाणाहून पणत्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असते.

वेळापुर येथील कै.पांडूरंग रोकडे हयात असतांना पणत्या विकण्यासाठी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी, घरोघरी पणत्या विक्रीसाठी त्याकाळी प्राण्यांची मदत घेत असत. आता त्यांचे नातू एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ अधिकारी सचिन रोकडे हे आधुनिक जगात मोटारसायकलवर घरोघरी फिरून विकत आहेत.

अभिमानाची गोष्ट अशी की आता सर्व समाज सुशिक्षित आणि उच्चभ्रू झाला असतांना देखील फक्त समाजाप्रती असलेले आपले दायीत्व, आजोबांचा वारसा पुढे चालवायचा या भावनेतून ते पणत्या विकत आहेत. त्यांच्या प्रयत्नांचे लासलगाव, वेळापुर, निमगाव, ब्राह्मणगाव परिसरातील नागरिक व महिलांकडून कौतुक होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com