कायद्याच्या पाठबळानंतरही नारी अबलाच

कायद्याच्या पाठबळानंतरही नारी अबलाच

अ‍ॅ‍ॅड. क्षमा संगमोळी

कायदे महिलांच्या बाजूने असले तरी महिलांमध्ये जागरुकता व त्यांनी दाखल केलेल्या तक्रारींवर तातडीने कारवाई होत नसल्याने अत्याचार सोसण्याशिवाय महिलांकडे पर्याय नसल्याचे चित्र आहे. यासाठी महिलांनी स्वत: कायद्याचे ज्ञान घेऊन प्रतिकार करण्यासाठी उभे राहिले नाहीतर त्यांचे शोषण होतच राहणार आहे.

पुरुषप्रधान संस्कृतीमुळे ग्रामीण भागात बर्‍याच ठिकाणी महिला पुरुषांविरुद्ध उभे राहण्यास हिंमत करत नाहीत. परिणामी महिला त्यांच्यावर होणारा अत्याचार सहन करत राहतात. कालांतराने ती परंपरा झाल्याचे दिसून येते.बर्‍याच ठिकाणी आपल्यावर अत्याचार होत असले तरी त्यांना त्याचे फारसे वाईट वाटत नाही आणि अत्याचार सहन करण्याची जणू आपली जबाबदारी असल्याचा गैरसमज काही महिलांमध्ये निर्माण झाल्याचे दिसून येेते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

महिलांच्या संरक्षणासाठी त्यांच्या बाजूने शासनाने अनेक कायदे केलेले आहेत. मात्र त्याबाबत महिलांमध्ये जागरुकता दिसून येत नाही. शहरी भागात काही अंशाने महिला जागरुक असल्या तरी ग्रामीण भागात मात्र मोठी तफावत दिसून येते.

बर्‍याच वेळा याबाबत शासकीय स्तरावर निर्णयाची गतिमानता दिसून येत नाही. तक्रार केली तर तिची कार्यप्रणाली ही दीर्घ आहे. त्याचे फायलिंग करणे, एप्रुव्हल करणे यात होणारा कालापव्यय गुन्ह्याची दाहकता कमी करतो. परिणामी अत्याचार करणार्‍यावर जरब बसवण्याऐवजी त्याचे मनोबल वाढवणारीच ठरत असते. त्यामुळे आपोआपच अत्याचार सहन करणार्‍यांची हिंमत खचत जाते.

शब्दांकन- रवींद्र केडिया

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com