
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्ह्यातील सर्व खाणींचे आता ईटीएसद्वारे (ETS) मोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. बहुतांशी खाणींची मोजणी (Counting of Mines) झाली असून
झालेले उत्खनन आणि संबंधित व्यावसायिकांनी भरलेली रॉयल्टीची (royalty) तपासणी जिल्हा गौण खनिज विभागाद्वारे (District Subordinate Mineral Department) सुरू असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे (Additional Collector Babasaheb Pardhe) यांनी दिली.
अनधिकृतरीत्या तसेच परवानगीपेक्षा अधिकचे उत्खनन केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गौण खनिज व्यावसायिकांचे धाबे चागलेच दणाणले आहे. नाशिक शहर (nashik city) व परिसरातील हिरव्यागार असलेल्या डोंगर मोठ्या प्रमाणात बोडके करण्याचा प्रकार सर्रासपणे सुरु आहे. जिल्ह्यातील गौण खनिज व्यावसायिकांकडून परवानगी दिलेल्या कालावधीपेक्षा अधिक कालावधीपासून काही खाणींमधून खोदकाम सुरूच आहे.
परवानगी दिलेल्या प्लॉट व्यतिरिक्त इतर प्लॉटवर होणारे उत्खनन, करण्यात आलेले वाढीव उत्खनन, त्यापोटी बुडवलेला राज्य शासनाचा महसूल, संबंधितांवर कारवाईसाठी केली जाणारी चालढकल यामुळे संपूर्ण राज्यभर चर्चेत आलेल्या जिल्ह्यातील अनधिकृत उत्खननावर (Unauthorized excavation) राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनीच आता लक्ष केंद्रित केले आहे.
सिन्नर, दिंडोरी, येवला, मालेगाव, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि कळवण या तालुक्यातून अवैध उत्खननाची माहिती एकत्रित केली जात आहे. त्यानुसार भूमी अभिलेख (Land Records), सार्वजनिक बांधकाम विभाग (Department of Public Works) आणि महसूल विभागाचे अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकातर्फे खाणींची ईटीएसद्वारे मोजणी करण्यात आली आहे. संबंधित व्यावसायिकांनी घेतलेली परवानगी' तसेच झालेले उत्खननाची उलट तपासणी केली जात असून भरलेली रॉयल्टीही तपासली जात आहे.
त्यानुसार लवकरच अहवाल तयार करून तो वरिष्ठांना सादर केला जाईल. दरम्यान, यात परवानगीपेक्षा अधिक किंवा अधिकृतरीत्या उत्खनन केलेले आढळल्यास थेट कारवाई केली जाणार असल्याचा इशारा अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी दिला आहे.त्यामुळे गौण खनिज व्यावसायिकांचे धाबे चागलेच दणाणले आहे.