वृक्षमित्र पथकाची स्थापना

वृक्षमित्र पथकाची स्थापना

वडांगळी । वार्ताहर Vadangali

वडांगळी ग्रामपंचायतीने Vadangli Grampanchayat लावलेल्या 2100 झाडांच्या संगोपन, संरक्षणासाठी न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या 42 पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

वडांगळी ग्रामपंचायतीने लोकवर्गणीतून 2100 झाडांची खरेदी केली असून ग्रामनिधीतून शिवस्वराज्य दिनानिमित्ताने या रोपांची लागवड केली आहे. झाडे लावूनही त्यांचे संगोपन न केल्याने बहुतांशी झाडे मृत होतात. म्हणून ग्राम पंचायतीद्वारे ग्रामनिधीतून एक लाख रुपयांच्या झाडांच्या संरक्षणासाठी protection of trees 1500 प्लास्टिक संरक्षक जाळ्या खरेदी केल्या.

तसेच झाडांना पाणी देण्यासाठी ड्रीप व्यवस्थेचे काम सुरू केले आहे. सार्वजनिक ठिकाणी, मैदानावर, रस्त्याच्या कडेला लावलेल्या रोपांच्या संगोपनासाठी शाळा, ग्रामपंचायतीने संयुक्तिक जबाबदारी घेतली आहे.

उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांवर नियंत्रणासाठी शिक्षकांची नेमणूक होणार आहे. प्लास्टिक संरक्षक जाळी उभी करण्यासाठी लोखंडी सपोटिंग गार्ड बनवण्यात येणार आहेत.

एक वर्षानंतर अव्वल झाडे बनवणार्‍या शालेय वृक्षमित्र पथकाला पाच हजार रुपयांचे पहिले बक्षीस सरपंच योगेश घोटेकर, तीन हजार रुपयांचे द्वितीय बक्षीस उपसरपंच गायत्री खुळे, दोन हजार रुपयांचे तृतीय बक्षीस संस्थेचे सभासद विक्रम खुळे हे देणार आहेत.

दर महिन्याला शालेय समितीचे अध्यक्ष सुदेश खुळे, मुख्याध्यापक पवार, राजेंद्र भावसार, कलकत्ते याचा आढावा घेणार आहेत.

Related Stories

No stories found.