उद्योगांच्या तपासणीसाठी एमआयडीसीचे भरारी पथक
करोना

उद्योगांच्या तपासणीसाठी एमआयडीसीचे भरारी पथक

सातपूर । प्रतिनिधी

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लॉकडाऊनमध्ये उद्योगांना काही निर्बंधांचा अवलंबन करून कामकाज सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र काही उद्योगांमध्ये या निर्बंधांचे पालन होत नसल्याने कामगारांचा जीव धोक्यात येत असल्याची कामगारांची तक्रार आहे. या तक्रारीची दखल घेत एमआयडीसीकडून आता उद्योगांकडून ही मार्गदर्शक तत्त्वे पाळली जातात की नाही हे तपासण्यासाठी भरारी पथकांची स्थापना केली जाणार आहे.

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत उद्योगांना सूट देण्यात आली आहे. मात्र काही निर्बंध लावण्यात आले आहेत. जिल्ह्यातील बहुतांश उद्योग सुरळीत सुरू असले तरी बहुतांश उद्योगांमध्ये शासनाने घालून दिलेल्या नियमावलीची पायमल्ली होत असल्याने कामगार नेत्यांद्वारे तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेक कारखान्यांतील कामगार नेते करोना संक्रमित झालेले आहेत.

उद्योगांकडून कुठल्याही नियमांचे पालन होत नसल्याने तसेच कामगारांना घरापासून कंपनीपर्यंत तर कंपनीपासून घरापर्यंत जाण्यासाठी बसची सुविधादेखील उपलब्ध होत नसल्याने संक्रमण वाढण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. जे उद्योग मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत नाहीत अशा उद्योगांच्या तपासणीसाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात येत आहे.दोषी उद्योगांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

नितीन गवळी (प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com