नाशिक विमानतळ नामांतर कृती समिती स्थापन

नाशिक विमानतळ नामांतर कृती समिती स्थापन
USER

आंबेदिंंडोरी । वार्ताहर Aambe Dindori

नाशिक विमानतळ ( Nashik / Ozar Airport ) नामांतर कृती समितीची स्थापना डॉ. आंबेडकर नगर विविध रिपब्लिकन आंबेडकरी पक्ष ( RPI) संघटनाचे प्रमुख पदधिकारी यांची बैठक संपन्न झाली.९ आँगस्ट रोजी क्रांतीदिनाचे औचित्य साधून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड महामोर्चा घोषित करण्यात आला आहे.

वंचित बहुजन आघाडी चे नेते प्रकाश आंबेडकर यांचे नाशिक विमानतळास पद्मश्री कर्मवीर खासदार दादासाहेब गायकवाड (Karmaveer Dadasaheb Gaikwad ) यांचे नाव देण्याच्या मागणीला समर्थन मिळवीण्यासाठी कृती समीती चे शिष्टमंडळ भेट घेणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले.त्याच प्रमाणे रिपब्लिकन नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेवून सदर विमानतळ नांमतराचा ठराव केंद्रीय मंत्री मंडळात मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान करण्यात येणार आहे.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड विमानतळ ह्या नांमतरासाठी प्रादेशिक मेळावे निमंत्रित करण्यात येणार असून पहिला मेळावा १८ जुलै रोजी पुणे येथे घेण्याचे आयोजित करण्यात आले आहे.सुमारे चार तास चालेल्या बैठकिचे आयोजन तानसेन नन्नावरे व दादासाहेबांचे पंतू सागर गायकवाड यांनी बैठक आयोजित केल्या बद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.

सदर बैठकीत महत्त्व पुर्ण चर्चा होवून,बैठकीस मनोज संसारे,दयाल बहादूरे,राहूल डंबाळे,बाळराजे शेळके, विश्वनाथ काळे,प्रकाश लोंढे, पवन पवार, रवींद्र जाधव, किशोर घाटे,संजय साबळे,चिंतामण गांगुर्डे, दिनकर धीवर,मदन शिंदे,विलास कटारे,आनंद निर्भवने,नानासाहेब भालेराव, अँड अविनाश साळवे, विष्णू जाधव, संजय भालेराव, इश्वरसिंग झंजोटड,काशीनाथ हिरे,अमोल पगारे, कुणाल वाघ,अनिल आठवले,रमेश जाधव,सुरेश डांगळे, दादाभाऊ केदारे,बाळा गांगुर्डे, बाळासाहेब पठाडे,अनिल सोनवणे,दिनेश अहिरे,रत्नाकर पगारे,संजय गवारे,भगवान सावंत,

दिलीपदास वाणी,राजरतन राजगुरू, अमित हिरवे,रंभाताई भालेराव, छाया निकम,शांताबाई भोंगळे,शोभा चव्हाण,कलावती साळवे,तय्यबभाई शेख,अनिल पजारी,सोपनील केदारे, सलीम शेठ,मिलींद निकम,सागर क्षीरसाठ,महेंद्र पगारे आदिंसह कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते,

सदर बैठकीस राजेंद्र गायकवाड, दिपक नन्नावरे, अमित गायकवाड, साहिल गायकवाड,राजेंद्र मो गायकवाड, अशोक गायकवाड, योगेश नन्नावरे, अनिकेत गायकवाड, आशिष नन्नावरे, सौरभ गायकवाड आदिंनी परिश्रम घेतले.सदर कृती समितीचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन तांनसेन नन्नावरे यांनी केले.तर आभार सागर गायकवाड यांनी केले.सदर कार्यक्रमाचा समारोप राष्ट्र गीताने करण्यात आला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com