वारकरी भवनात मूर्ती प्राणप्रतिष्ठा

वारकरी भवनात मूर्ती प्राणप्रतिष्ठा

सिन्नर । वार्ताहर Sinnar

शहरातील विजयनगर ( Vijayanagar-Sinnar ) भागातील वारकरी भवनात ( Warkari Bhavan ) रंगलेल्या पांडुरंगाच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते येथील विठ्ठल मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा .

सोमेश्वरानंद महाराज यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. कलशारोहण देवानंदगिरीजी महाराज, महामंडलेश्वर सोमेश्वरानंद महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर रामराव महाराज ढोक यांच्या सुमधूर वाणीतून कीर्तन सोहळा रंगला. ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे यांच्या हस्ते ढोक महाराजांचा सत्कार करण्यात आला.

वास्तू विशारद जितेंद्र जगताप, मंदिरासाठी फरशी उपलब्ध करून देणारे राजेश उपासनी, मंदिराचे बांधकाम व रंगरंगोटी करणारे कारागिर यांच्यासह हातभार लावणार्‍या सर्वांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी आमदार राजभाऊ वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे, गटनेते हेमंत वाजे, विरोधी पक्षनेते नामदेव लोंढे, उदय सांगळे, नगरसेवक शैलेश नाईक, प्रमोद चोथवे, पंकज मोरे, रुपेश मुठे, सोमठाणेचे सरपंच भारत कोकाटे, रामभाऊ नरोटे, श्रीकांत जाधव, तालुक्यातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, वारकरी, भजनी मंडळ व भाविक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com