मेडिकल ऑक्सिजनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन स्थापन

मेडिकल ऑक्सिजनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन स्थापन

नाशिक । Nashik

आॅक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलला पुरवठादारांकडून ऑक्सीजन मिळण्यात अडचण निर्माण झाल्यास यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून अन्य पर्यायी व्यवस्था काय आहे.

याची माहिती घेण्यासाठी हेल्प लाईन स्थापन करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा मेडिकल ऑक्सिजन कक्षाचे समन्वयक दत्तप्रसाद नडे यांनी दिली आहे.

करोना संसर्गाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असून सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात कोवीड बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्याची आॅक्सिजन मागणी दिवसाला १३८ मेट्रिक टन असून शासनाकडून दिवसाला ८५ मेट्रिक टनचा आॅक्सिजन कोटा मंजूर करण्यात आला आहे.

जिल्ह्यात ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या विविध उत्पादकांनी त्यांच्या पुरवठादाराकडून मेडिकल ऑक्सिजन मिळवणे व विविध हॉस्पिटलनी त्यांचे त्यांचे कराराप्रमाणे स्थानिक उत्पादकांकडून ऑक्सीजन उपलब्ध करून घेणेची प्रचलित कार्यपद्धती तशीच कायम असणार आहे.

परंतु सद्यस्थितीत अचानकपणे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत असल्यामुळे काही वेळा संबंधित नाशिक महानगरपालिका, मालेगांव महानगपालिका व नाशिक ग्रामिण भागातील रुग्णालयांतील मेडीकल ऑक्सिजन संबधी समस्यांच्या निराकरणासाठी जिल्हास्तरावर स्थापन केलेल्या नियंत्रण या कक्षाचा संपर्क क्रमांक 9405869940

असा आहे. मेडिकल ऑक्सिजनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन स्थापन करण्यात आली आहे असे अतिरिक्त जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com