त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर
नाशिक

त्र्यंबकेश्वर : घराघरात गणेशाची स्थापना करा..

मंडळांना पोलिसांचे अवाहन

Gokul Pawar

Gokul Pawar

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

त्र्यंबकेश्वर येथे शांतता समिती त्याच प्रमाणे गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष यांच्या संयुक्त बैठकीत एक गाव एक गणपती तसेच मंडळांनी घरगुती स्वरूपात गणपती बसवावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

यावेळी तहसीलदार दीपक गिरासे, डीवायएसपी भीमाशंकर ढोले, नगर पालिका मुख्याधिकारी संजय जाधव, पोनी रामचंद्र कर्पे, वीज मंडळाचे अभियंता किशोर सरनाईक, गोपनीयचे जाधव काकड इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

आगामी गणेशोत्सव साध्यापणाने साजरा करण्यात यावा, मिरवणूक तसेच घरातच मूर्तीची स्थापना करावी अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. यबाबतचे एक परिपत्रक तालुका प्रशासनाने काढले आहे. त्याचप्रमाणे काल रोजी शहरात पोलिसांकडून संचलन करण्यात आले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com