राष्ट्रीय कला-क्रीडा विद्यापीठ स्थापन करा

राष्ट्रीय कला-क्रीडा विद्यापीठ स्थापन करा
देशदूत न्यूज अपडेट

येवला | प्रतिनिधी | Yeola

केंद्र व सर्व राज्य सरकारांनी राज्य कला-क्रीडा विद्यापीठ स्थापना करावे, अशा मागणीचे निवेदन अध्यापक भारतीच्या वतीने राष्ट्रपती, पंतप्रधान, क्रीडा मंत्री यांसह देशातील सर्व राज्यपाल व संबंधित खात्याचे मंत्री व अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती शरद शेजवळ यांनी दिली आहे...

निवेदनात म्हटले आहे की, भारत देशात कला-क्रीडा शिक्षण विकासासंदर्भात कोणताही ठोस धोरणात्मक कार्यक्रम नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे. कला-क्रीडा शिक्षण, प्रशिक्षणाबद्दल केवळ शासकीय घोषणाबाजी होते. प्रत्यक्षात मैदनात कोणतीही कृती नियोजन नसते.

शाळा, महाविद्यालय पातळीवर खेळाचे प्रशिक्षण, विविध क्रीडा स्पर्धांना मार्गदर्शन व आर्थिक तरतूद करुन नवोदय विद्यालय, केंद्र आणि राज्य सरकारांनी राष्ट्रीय-राज्य कला-क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी अध्यापकभारतीचे संस्थापक तथा राष्ट्रीय कला-क्रीडा विद्यापीठ स्थापना अभियानचे निमंत्रक शरद शेजवळ २००६ पासून करत आहेत.

क्रीडा विद्यालयासाठी जनजागृती करण्यासाठी अध्यापकभारतीच्या वतीने कला-क्रीडा शिक्षण हक्क परिषद घेऊन राष्ट्रीय कला-क्रीडा विद्यापीठ स्थापना अभियान सुरु करण्यात आले.

जिल्हा स्तरावर निवासी क्रीडा विद्यालय, महाविद्यालय स्थापन करावीत, कला -क्रीडा विषय तासिका पूर्ववत कराव्यात, विद्यार्थी संख्येप्रमाणे क्रीडा शिक्षक नेमावा, क्रीडा धेारण त्वरीत अंमलात आणावे, स्पर्धा-प्रशिक्षण या करीता जास्तीत जास्त अर्थिक तरतूद करण्यात यावी. खेळाडूंच्या शासकीय नोकरी नियुक्तीत पारदर्शकता आणावी, अशा प्रमुख मुद्द्यांसंदर्भात केंद्र व राज्य सरकारकडे पाठ पुरावा केला जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com